Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Cyber Fraud : सायबर फ्रॉड करून आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ हा नंबर डायल करा तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील?

  





Cyber Fraud : सायबर फ्रॉड करून आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ हा नंबर डायल करा तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील ?








सायबर फ्रॉड (Cyber Fraud) आता शहरापासून अगदी लहान खेड्यापर्यंत पोहोचलेला आहे. आता डिजिटल युग आहे त्यामुळे मोबाईल वरून पैशाची देवाण घेऊन होत आहे. त्यामुळे सायबर क्राईमच्या घटनेत वाढ झालेली आहे. जर असा काही फसवणूक प्रकार तुमच्या बाबतीत घडत असल्यास तुम्ही १९३० हा नंबर डायल करा.




● Cyber fraud मध्ये मोठी वाढ,


● १९३० हेल्प लाईन नंबर,


● बँक खात्यातून गेलेले पैसे परत मिळू शकेल.




पुणे : आता डिजिटल युगाचा जमाना झालेला आहे. सर्व काही व्यवहार हे डिजिटल देवाण-घेवाण मधून होत आहेत. म्हणजे सर्व काही मोबाईल वरून पैशांची देवाण-घेवाण सुरू असल्याने ऑनलाईन फसवणूक मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेकांना चुकीची माहिती देऊन त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढले जात आहेत. तर तुम्ही ऑनलाईन सायबर फसवणुकीचे बळी ठरत असाल तर तात्काळ एक नंबर डायल करा. यानंतर तुमच्या बँक खात्यातून गेलेले पैसे परत मिळू शकतात. अनेकदा फ्रॉड करणाऱ्या व्यक्ती तुम्हाला तुमच्या बाबतीत चुकीची माहिती देऊन तुमच्याकडून ओटीपी (OTP) मागवून घेतात. त्यानंतर ते तुमच्या खात्यातून अन्य खात्यात पैसे ट्रान्सफर करतात. हे तुम्हाला काही कळायच्या आत म्हणजे काही सेकंदात घडत असते. त्यामुळे अनेक जण फक्त हात चोळत बघत बसतात. अशावेळी त्यांना पुढे काय करावे हे सुचत नाही. परंतु तुम्ही जर वेळीच योग्य ठिकाणचा योग्य नंबर डायल केला तर तुम्हाला तुमचे गेलेले सर्व पैसे परत मिळू शकतात.



पंतप्रधान मुद्रा योजना : किती आणि कसे मिळेल कर्ज? वाचा सविस्तर माहिती




सायबर फ्रॉड झाल्यास काय कराल?


सायबर फ्रॉडची घटना घडल्यास सर्वात आधी सायबर क्राईम नंबरला कॉल करा. किंवा ऑनलाईन प्रोसेसने तक्रार दाखल करा.



अशी करा तक्रार 


जर तुमच्या सोबत ऑनलाईन फ्रॉड किंवा सायबर फ्रॉड झाला असेल तर सर्वात आधी १९३० नंबरवर डायल करून कॉल करा. सायबर फ्रॉड झाल्यानंतर ६० मिनिटापेक्षा कमी वेळेत १९३० या नंबरवर डायल करून कॉल करणे गरजेचे आहे. तसेच ऑनलाईन प्रोसेसने तक्रार दाखल करता येऊ शकते परंतु याची प्रोसेस मोठी आहे.



ऑनलाइन तक्रार अशी करा दाखल 


सर्वात आगोदर www.cybercrime.gov.in या सरकारी वेबसाईटवर साइन अप करा. परत अकाउंट लॉग इन झाल्यानंतर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करा. पुढे File A Complaint या ऑप्शनवर क्लिक करा.




Cibil Score मोफत तपासणी करून तुमच्या नावाने कोणत्या बँकेत किती कर्ज आहे ? पहा




आता पुढे काय कराल ?


या नंतर तुम्हाला Term's and Conditions (टर्म अँड कंडिशन) ऑप्शनची निवड करावी लागेल.


त्यानंतर Report Under Cyber Crime (रिपोर्ट अंडर सायबर क्राईम) ह्या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.


यानंतर एक पेज ओपन होईल त्यामध्ये एक फॉर्म दिसेल.


या फॉर्ममध्ये ४ पार्ट असतात. ज्यात तुम्हाला तुमची आवश्यक माहिती भरावी लागेल.


फॉर्म मध्ये इन्सिडेंट, सस्पेक्ट, कम्प्लीट डिटेल्ससह प्रिव्ह्यू आणि सबमिट करावे लागेल.


ही सर्व माहिती भरल्यानंतर Save And Next (सेव्ह अँड नेक्स्ट)  वर क्लिक करावे लागेल.


वरील सर्व माहितीचा रिव्ह्यू केल्यानंतर सबमिट करावी लागेल.




Cyber Crime : सायबर क्राईमची ऑनलाइन तक्रार दाखल करण्यासाठी येथे क्लिक करा




अशा प्रकारे तुमची ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर सायबर क्राईम अंतर्गत तक्रार दाखल होईल. त्यानंतर सायबर पोलिस अधिकारी तुमच्या फसवणूक बाबत तात्काळ गुन्हा नोंद करून कारवाईचे आदेश देतील. आणि काही अंशी तुमचे पैसे परत येण्याची शकता असते. पण त्यासाठी घटना घडल्यानंतर तात्काळ तक्रार दाखल करण्यात आली पाहिजे. आणि संबंधित अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाठपुरावा करते वेळी त्यांची भेट तर आवश्यक त्यावेळी घ्यावी. पण प्रत्येक वेळी भेट देते द्याल तेव्हा न विसरता ई-मेल करणे किंवा लेखी तक्रार दाखल करणे आवश्यक आहे.


आपली तक्रार आहे आणि आपली फसवणूक झाली असेल तर सातत्याने पाठपुरावा करणे क्रमप्राप्त आहे. एक म्हण आहे ती अशी की 'सरकारी काम आणि सहा महिने थांब.' त्यामुळे वेळीच सावध होईन लिहिते व्हा. आणि फसवणूक होणार नाही याची प्रथम काळजी घ्यावी.







Post a Comment

0 Comments

close