Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मोबाइल हरवला आहे तर महत्वाचा डेटा असा करा डिलिट | If The Mobile Is Lost, Delete The Important Data In Marathi

                       मोबाइल हरवला आहे तर महत्वाचा डेटा असा करा डिलिट 


Immage Secure By -pixabay.com


If The Mobile Is Lost, Delete The Important Data In Marathiहल्ली मोबाईल म्हणजे आपल्यासाठी सर्व काही झाले आहे. पूर्वी केवळ फोन करणे किंवा संदेश पाठवण्यात पर्याय मर्यादित असलेला मोबाईलचा वापर प्रचंड वाढलेला आहे. कार्यालय, व्यवसायिक, आर्थिक आदी सर्व कामे आता मोबाईलवर केले जाऊ लागली आहेत. एवढेच नव्हे तर तुमचे सर्व बँक व्यवहार सुद्धा मोबईल वर होत असतात.  त्यामुळे लोक रात्रंदिवस मोबाईल मध्ये गुरफटले गेले आहेत. मात्र मोबाईल हरवल्यास महत्त्वाचा सर्व डेटा आणि खासगी माहिती इतरांच्या हाती लागण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे आपली संपूर्ण बँकेच आपल्या मोबाईल मध्ये समाविष्ट केलेली असते. तसेच आपल्या मोबाइलमध्ये इतर महत्त्वाची कागदपत्रे सुद्धा आपण Save करत असतो. मोबाईल हरवला आणि तो इतरांच्या हाती लागला तर अनर्थ होऊ शकतो. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. तुमच्या हरवलेल्या मोबाईल मध्ये असलेला महत्वाचा डेटा Delet करता येणार आहे.  यासंदर्भात आपण या लेखांमध्ये संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

* डेटा डिलीट करण्याची प्रक्रिया - The Process of Deleting Data


हरवलेल्या अँड्रॉइड मोबाईलचा शोध घेण्यासाठी तसेच त्यातील डेटा डिलीट करण्यासाठी दुसऱ्या अँड्रॉइड मोबाईल वर अँड्रॉइड डिव्हाइस मॅनेजर ॲप इन्स्टॉल करा.


तुमच्याकडे दूसरा अँड्रॉइड मोबाईल नसेल तर तुम्ही संगणकावर किंवा लॅपटॉपवर android.com/ या संकेत स्थळावर जाऊन जीमेल अथवा गुगल अकाउंट लॉगिन करावे. महत्त्वाची बाब म्हणजे हरवलेल्या मोबाईल मधील गूगल अकाऊंट आणि तुम्ही आत्ता लॉगीन करत असलेले अकाउंट दोन्ही एकच असणे आवश्यक आहे.


लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या हरवलेला मोबाईल मध्ये तुमचे गुगल अकाऊंट असेल त्यावर एक नोटिफिकेशन जाईल आणि तुम्हाला त्याचे लोकेशनही कळेल. मोबाईल बंद असल्यास त्याचे शेवटचे लोकेशन तुम्हाला दिसेल. तसेच तुम्हाला काही पर्याय उपलब्ध होतील. ते कोणते पर्याय असेल आपण ते आता पाहणार आहोत.* रिंग साऊंड - Ring Sound -


रिंग साऊंड या पर्यायावर क्लिक केल्यास तुमचा हरवलेला मोबाईल सायलेंट अथवा व्हायब्रेटर मोडवर असला तरी फोनची रिंग वाजत राहणार आहे. त्यामुळे मोबाईल जवळपास असेल तर लगेच आपणाला कळेल.


सिक्यूअर डिव्हाईस - Secure Device -


सिक्युअर डिव्हाईस या पर्यायावर क्लिक केल्यावर मोबाईल लॉक करता येईल. आणि केवळ तुम्हीच सेव (Save) केलेला पिन नंबर लॉक पॅटर्न (PIN number lock pattern) किंवा पासवर्डच्या मदतीनेच उघडता येईल. तुमच्या मोबाईल मध्ये लॉक पॅटर्न सेट केला नसेल तो करता येईल.


हे पण वाचा - यु ट्यूब च्या माध्यमातून करोडपती व्हाइरेज डिव्हाईस - Erase Device -


इरेज डिव्हाईस या पर्यायाच्या मदतीने मोबाईलच्या अंतर्गत मेमरीत असलेल्या डेटा कायमस्वरूपी डिलीट करता येईल. मात्र मेमरी कार्ड वरील डेटा डिलीट करता येणार नाही. ज्या व्यक्तीला तुमचा मोबाईल सापडेल त्याला तुमचा मोबाईल परत करता यावा म्हणून तुमच्या हरवलेल्या मोबाईलचा लॉक स्क्रीन वर संदेश पाठवून तुमचा दुसरा क्रमांक किंवा पत्ता पाठवता येईल. मोबाईल सापडल्यावर तुमचा मोबाईल पुन्हा सुरू करण्यासाठी त्यात गुगल अकाउंट लॉग इन करावे लागेल.


Immage Secure By -pixabay.com


अशाप्रकारे आपला हरवलेला मोबाईल आपण पुन्हा प्राप्त सुद्धा करू शकतो. किंवा आपला मोबाईल हरवला आहे, तर आपण अशाप्रकारे त्यातील महत्त्वाची माहिती आणि डेटा नक्कीच करू शकतो. वरील पर्याय एकदम साधा सोपा  असून एकदा नक्कीच करून पहावे. पण  शक्यतो कोणाचा मोबाईल हरवू नये. अशी आपण काळजी घ्यावी. जर मोबाईल हरवला असेल तर मोबाईल हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये द्यावी. जर  मोबाईल चोरी गेलेला असेल तर मोबाईल चोरी गेलेला आहे. अशी तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल करवी. आणि त्याची पोच घेण्यात यावी. वेळोवेळी पाठपुरावा केला तर सदरच्या मोबाईलच्या ईएमआय (EMIE) वरून मोबाईल ट्रेस करता येतो.  आणि त्यामध्ये कोणत्या कंपनीचे सिम कार्ड आहे. हेसुद्धा पाहता येते आणि ते सिम कोणाच्या नावावर आहे. आणि त्यात मधून त्या मोबाईल चे लोकेशन कोणते आहे हे सिद्ध करता येते. 

                                        परंतु पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणे आणि त्यांचा पाठपुरावा करणे हे अनेकांना अवघड जातं. या भानगडीत कोणी पडत नाही. त्यामुळे मोबाईल जरी तुम्ही शोधत बसले नाही. तर नक्कीच तुम्ही त्यातील डेटा डिलीट करू शकता आमची माहिती तुम्हाला आवडले असतात कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद. हे पण वाचा - ह्या १० टिप्सनुसार यशस्वी यूट्यूब चैनल तयार करून लाखो कमवाInformation source - THTS TEEM


Post a Comment

2 Comments

close