Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Cibil Score मोफत तपासणी करून तुमच्या नावाने कोणत्या बँकेत किती कर्ज आहे ? पहा




Cibil Score मोफत तपासणी करून तुमच्या नावाने कोणत्या बँकेत किती कर्ज आहे ? पहा
 




तुम्ही कदाचित कर्ज घेतले नसेल आणि त्याची नोंद सीबील स्कोअरला झाली असेल किंवा तुमच्या पॅन कार्ड आणि आधार कार्ड चा गैरवापर करून तुमच्या नावे कोणी कर्ज काढले असेल तर तुम्हाला सीबील स्कोअर तपासणीत लगेच लक्षात येईल.  




● Cibil Score म्हणजे काय?

● Cibil Score मुळे कर्ज किती आहे हे समजेल? 

● Cibil Score कसा निश्चित केला जातो?

● Cibil Score चांगला किती असतो?

● Cibil Score काय दर्शवत असतो? 



● Cibil Score म्हणजे काय? 

सीबील स्कोअर हा क़र्ज़ आणि आर्थिक पत ठरवण्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. जो आपल्याला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देण्याच्या वेळी बँक किंवा फ़ाइनैन्स कंपनी विचारात घेते. आपल्या क़र्ज़ परतफेड करण्याच्या वर्तनाचा हा एक अंकात्मक सारांश आहे असे म्हणता येईल.


Sibil Score म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड आताची ट्रान्सयुनियन सिबिल लिमिटेड ही कंपनी सण २०००मध्ये स्थापन झाली आहे. ही भारतातील पहिली पत माहिती जमा करणारी कंपनी आहे. ती व्यक्ती, कंपनी आणि व्यावसायिक संस्थांच्या पत रेकॉर्ड संकलित करून त्यावर देखरेख करत असते. यामध्ये कर्ज आणि क्रेडिट सह सर्व इत्यंभूत माहितीचा समाविष्ट असतो.Cibil ही भारतात काम करणाऱ्या ४ क्रेडिट कंपनी पैकी एक कंपनी आहे.


● Cibil Score मुळे कर्ज किती आहे हे समजेल? 

आपल्या क्रेडिट रिपोर्टचा स्कोर हा दर सहा महिन्यांनी आपण स्वतः तपासला पाहिजे. कारण यावरून आपल्याला आपल्या नावावर चालू आणि बंद झालेलं कर्ज कोणकोणत्या बँकेच्या आहे ते समजते. तसेच आपल्या सिबिल स्कोर बाबत आपण जागरूक असणे आवश्यक आहे. आपल्या सिबिल स्कोर किंवा क्रेडिट रिपोर्टमध्ये जर तुमच्या नावावर कर्ज दाखवत असेल व तुम्ही ते कधीच घेतलेले नसेल. तर याबाबत तुम्हाला त्या कर्जाची तक्रार सुद्धा करता येईल. तुमच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डचा गैरवापर करून कोणी तुमच्या नावावर जर कर्ज घेतले असेल तर ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल.


● Cibil Score कसा निश्चित केला जातो?

तुमच्याकडे असलेले कर्ज जसे की वाहन कर्ज, गृह कर्ज,  वैयक्तिक कर्ज, कृषी कर्ज आणि सोने तारण कर्ज इत्यादी कर्जाची तुम्ही परतफेड वेळेवर केली असेल. तसेच तुमच्या बँक खात्यावरील व्यवहार या सर्वांचा ताळमेळ घालून तुमचा सिबिल रिपोर्ट तयार होतो. क्रेडिट स्कोर हा ७५० ते ९००च्या दरम्यान असल्यास कमी वेळात तुम्हाला बँकेकडून सहज कर्ज उपलब्ध करून दिले जाते.





● Cibil Score चांगला किती असतो?

तुमचा सिबिल स्कोर कमीत कमी ७५० ते ९०० च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. जर तुमचा सिव्हिल स्कोर ७५० च्या खाली असेल तर तुमचा सिबिल स्कोर हा खराब आहे असे समजले जाते. क्रेडिट स्कोर वेळोवेळी चेक करत राहणे आवश्यक आहे. तुमचा सिव्हिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज इत्यादी प्रकारची कर्ज मिळण्यास अडचण येणार नाही.


तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर बँकेकडून तुम्ही क्रेडिट कार्ड वर देखील कर्ज मिळू शकतात.


● Cibil Score काय दर्शवत असतो?

जव्हा तुम्ही कर्ज घेण्यासाठी बँकेत जाता तेव्हा सर्वात प्रथम समोर येतो ते म्हणजे सिबिल स्कोर. वास्तविक कर्जासाठी सिबिल स्कोर हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जो कर्ज उपलब्ध होईल का नाही हे ठरवतो. या सोबतच कर्जाचा व्याज दर  ही सीबील स्कोर निश्चित करत असतो. विशेषत गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज घेताना सिबिल स्कोरची भूमिका ही महत्त्वाची असते. सरळ सरळ बोलायचं जर झालं तर सिबिल स्कोर हा ग्राहकाचा क्रेडिट इतिहास दर्शवत असतो.

म्हणजेच बँकेच्या ग्राहकाची पत निश्चित करत असतो. सिबिल स्कोरमध्ये तुमची स्वतःची आर्थिक पत तुम्ही कशी राखली आहे आणि तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे दर्शवत असतो.


तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करून कोणी सिम वापरत तर नाही ना ? येथे क्लिक करून पहा










Post a Comment

0 Comments

close