Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेतकरी आणि नागरिकांना स्टॅम्प न देणे आणि खरेदी दस्तास नकार देणे आता स्टॅम्प व्हेंडर आणि दुय्यम निबंधक यांना महागात पडेल



शेतकरी आणि नागरिकांना स्टॅम्प न देणे आणि खरेदी दस्तास नकार देणे आता स्टॅम्प व्हेंडर आणि दुय्यम निबंधक यांना महागात पडेल



दस्त नोंदणी अर्थात खरेदी - विक्री खत, गहाण खत, प्रतिज्ञा पत्र, बक्षिस पत्र, हक्क सोडपत्र, विशेष अधिकार पत्र, खरेदी -विक्री खत रद्द करणे बाबतीत नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत असतात.  त्याबाबत आपण माहिती घेणार  आहोत आणि त्याची तक्रार दाखल करण्यासाठी काय करावे लागेल हे पाहू या.

Important for customers purchasing fertilizer registration and stamps


१. पक्षकारांचे मुळ दस्त, प्रामाणिक दस्त, इंडेक्स चा उतारा अर्ज  दिल्याच्या दुसऱ्या दिवसी  सायं. ४.०० ते ५.०० या वेळेत देणे बंधनकारक आहे.


२. दस्तावेज़ मध्ये काही ञुटी असल्यास, तो नाकारल्यास त्याची माहिती दुय्यम निबंधकाने लेखी कळवणे बंधनकारक असते.


३. दस्तावेज लेखनाचे दर नाेंदनी महानिदेशकांनी निश्चत केले आहेत. दराचे पञक दर्शनीय ठिकाणी लावणे बंधनकारक असते.

४. स्टॅम्प विक्री करणाऱ्याने देण्यास नकार देणे, स्टॅम्पचे जास्त पैसे घेणे, दस्त तयार न करणे, किंवा दस्त तयार करण्याचे जादा पैसे घेणे.

५. गहाण खत दस्त, जुना खरेदी खत दस्त, खरेदी रद्द केलेला दस्त, हक्कसोड पत्र दस्त, बक्षीसपत्र दस्त, मालमत्ता शोध अहवाल ( प्रॉपर्टी सर्च रिपोर्ट) इंडेक्स 2 आणि इतर करारनामे यांचे सर्व दस्त हे अर्ज दाखल झाल्यापासून एका दिवसात देणे बंधनकारक आहे.



शेजारच्या शेतकऱ्याने शेती बांध कोरला असेल तर अशी घडवा अद्दल परत आयुष्यात कधीच बांध कोरणार नाही


६. दस्त नोंदणी न करणे, जुने दस्त न देणे, स्टॅम्प देण्यास नकार देणे, दस्त लिहिण्यास नकार देणे, इंडेक्स 2 न देणे, नागरिकांशी सौजन्याने न वागणे, उद्धट वागणूक देणे, नागरिकांना दमदाटी करणे, जास्तीचे पैसे म्हणे, दस्त नोंद (रजिस्ट्रेशन) केल्यावर पावती न देणे इत्यादी.

७) नागरिकांच्या तक्रारी आणि ग्राहकांच्या तक्रारी आणि गैरसोयीची तक्रार नोंदवण्यासाठी कार्यालयात एक तक्रार नोंदवही असते ती देण्यास नकार देणे.




Image Secure By - maharashtratoday.co.in 

 

८) स्टॅम्प व्हेंडर ने जर नागरिकांना स्टॅम्प दिला नाही किंवा स्टॅम्पचे जास्त पैसे घेतले तर अशा तक्रारी ह्या दुय्यम निबंधक कार्यालयात असणाऱ्या तक्रार नोंदवहित नोंद कराव्यात. ही तक्रार जोपर्यंत निकाली निघत नाही तोपर्यंत स्टॅम्प व्हेंडरला नवीन स्टॅम्प खरेदी करता येत नाही.

९) स्टॅम्प व्हेंडरला रोज किती स्टॅम्प विक्री झाले आणि किती शिल्लक आहेत याबाबतीत दुय्यम निबंधक यांना रोज अहवाल सादर करणे बंधनकारक असते.


अशा प्रकार च्या प्रकारच्या तक्रारींसाठी पुढील ठिकाणी न घाबरत निडरपणे संपर्क करा....


१. मा. दुय्यम निबंधक 

कार्यालयामध्ये सर्व तक्रारी ह्या स्वतंत्र अर्ज किंवा 

 तेथील तक्रार नाेंद वहीत नाेंदवा. 


२. मा. मुद्रांक जिल्हाधकारी तथा सहिनबंधक पुणे,

   माणिक शेठ दुगड चौक, 

   बिबवेवाडी काँर्नर,स्वारगेट,

   पुणे.


३. मा.नाेंदनी महानिरीक्षक,

   महाराष्ट्र राज्य, यांचे कार्यालय, 

   विधान भवन जवळ,पुणे.



हे पण वाचा - गुगल मॅप आता नव्या स्वरूपात ऑफलाईन मध्ये उपलब्ध होणार




Post a Comment

1 Comments

close