Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेग्युलर एसआयपी आणि डायरेक्ट एसआयपी समजून घ्या आणि लाखों रुपये वाचवा

 

म्युच्युअल फंड 


रेग्युलर एसआयपी आणि डायरेक्ट एसआयपी


Direct vs Regular Mutual Funds - Which plan is for you? Image Secure : motilaloswalmf.com


कल्पना करा की आपल्याला सुट्ट्यांमध्ये मालदीवला जायचे आहे आणि आपल्याला तिथली फारशी माहिती नाही. आपण आपल्या ट्रिपची आखणी कशी कराल? आपण एखाद्या एजंट कडून आपली ट्रिप बुक करू शकता किंवा अनेक तास घालवून राहाण्याची जागा, दर्शनीय स्थळे, येण्या-जाण्याची सोय इत्यादीची व्यवस्था पाहून नंतर आपल्या ट्रिपचा कार्यक्रम ठरवून मग स्वतः बुकिंग करू शकता. या दोघांमधील फरक असा आहे की एकामध्ये आपण बुकिंगसाठी एखाद्याची मदत घेत आहात, परंतु दुसर्‍यामध्ये आपण सर्वकाही स्वतः करत आहात.


डायरेक्ट आणि रेग्युलर प्लॅनमध्ये असाच फरक आहे. जेव्हा आपण एखाद्या वितरकाच्या माध्यमाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता, तेव्हा आपले पैसे त्या स्किमच्या रेग्युलर प्लॅनमध्ये गुंतवले जातात. जेव्हा आपण त्या फंड कंपनीसोबत थेट गुंतवणूक करता, तेव्हा आपले पैसे त्या स्किमच्या डायरेक्ट प्लॅन मध्ये गुंतवले जातात. दोन्ही प्लॅन आपल्याला त्याच स्किम आणि पोर्टफोलिओची दारे उघडून देत असले, तरीही त्यांत एनएव्हीचा आणि खर्चाच्या अनुपाताचा फरक असतोच. रेग्युलर प्लॅनमध्ये वितरकाचे कमीशन देणे असल्यामुळे रेग्युलर प्लॅनचा खर्चाचा अनुपात डायरेक्ट प्लॅनच्या तुलनेत अधिक असतो. यामुळे एकाच स्किमच्या रेग्युलर प्लॅनचा एनएव्ही डायरेक्ट प्लॅनच्या एनएव्हीच्या तुलनेत जरा कमी असतो.


जे गुंतवणूकदार रिसर्च करू शकतात आणि स्वतः आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करू शकतात त्यांनी डायरेक्ट प्लॅन निवडावा आणि इतरांसाठी रेग्युलर प्लॅन योग्य असेल.


आता अधिक सविस्तरपणे - 


१) तुम्ही वितरकामार्फत SIP सुरू केली तर त्यांना दरमहा १.०० % ते १.५ % अंदाजे कमिशन जातं असते. 


२) आणि ते कमिशन दरमहा आपल्या रकमेतून वजा होऊन उर्वरित रक्कम ही आपण काढलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये जमा होत असते.


३) जर तुम्ही वितरकामार्फत मासिक १०,००० ₹ SIP सुरू केली आणि ती २० वर्षे सुरू ठेवली. त्या SIP २० वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही बंद करून संपूर्ण रक्कम काढली.


४) तर तुम्हाला अंदाजे वार्षिक १२ % परतावा मिळाला असे गृहीत धरून तुम्हाला एकूण ९९.९१ लाख रुपये मिळतील. 


५) परंतु तुम्ही जर मासिक SIP डायरेक्ट सुरू केली तर तुम्हाला कोणालाही कोणत्याही प्रकारचे वितरकाला कमिशन द्यावे लागत नाही.


६) जर तुम्ही म्युच्युअल फंडाची मासिक १०,००० रुपयांची डायरेक्ट SIP सुरू केली आणि त्या SIP ला २० वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही ती बंद करून रक्कम काढली.


७) तर तुम्हाला अंदाजे वार्षिक १२ % परतावा + कमिशनचे वाचलेले १ %(+) परतावा असे एकुण १३ % परतावा मिळाला असे गृहीत धरले तर तुम्हाला तब्बल एकूण १ कोटी १४ लाख रुपये मिळतील. 


८) एकूण मूळ रकमेत १४ लाख कसे वाढले? तर तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंड काढला आहे, त्यामुळे वितरकाला कोणत्याही प्रकारचे कमिशन जाणार नाही.


९) वितरक हा मध्यस्थ असतो त्याला कमिशन म्हणून जाणारी रक्कम वाचते आणि तीच रक्कम ही आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या म्युच्युअल फंड्समध्ये जमा होत जाते.


१०) मध्यस्थ म्हणून असणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि कंपनी सामान्य गुंतवणूकदारांना थेट म्युच्युअल फंड आणि रेग्युलर म्युच्युअल फंड याबद्दल माहिती देत नाही. कारण त्यांना त्यांचा व्यवसाय चालवायचा असतो.


११) थेट म्युच्युअल फंड आणि रेग्युलर म्युच्युअल फंड याबद्दल अधिक माहिती देणारे Google वर अनेक लेख आणि युट्युबवर व्हीडिओ उपलब्ध आहेत.


१२) सामान्य प्रश्न : कोणते फंड्स घ्यावे? मासिक किती गुंतवणूक करावी? म्युच्युअल फंड किती वर्षे ठेवायचा? कंपाउंडिंग पावर काय असते? म्युच्युअल फंड अंतिम कधी बंद करावा? आणि पैसे कधी काढावे? मार्केट घसरले तर काय करावे? पैसे बुडू शकतात का? माझे पैसे मिळतील का? म्युच्युअल फंड्सला रिस्क असते का? कंपनी पैसे घेऊन पळाली तर काय करावे? Sip मध्येच बंद केली तर चालते का? मला पैसे काढता येतील का? डायरेक्ट म्युच्युअल फंड कोठे काढतात? 


१३) वरील सामान्य प्रश्न आणि माहितीसाठी Google करा आणि Youtube वर प्रश्न करा अनेक व्हीडिओ तुम्हाला महत्वाची माहिती देतील. 


उदाहरण : ◆ म्युच्युअल फंड म्हणजे काय?  रचना रानडे -    

              https://youtu.be/NTFdnoJoZeU?si=so2gpv7i1t2JYCBm 


          ◆ आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक  काळाची गरज -         

              https://youtu.be/ucLdkVbipYg?si=1Pml-5GT_x57yA9a 

          ◆ रेग्युलर म्युच्युअल फंड  विरुद्ध डायरेक्टम्युच्युअल फंड -    

              https://youtu.be/BG8gsDFCbRQ?si=ehdJPT-bqP_teXDA 


१४) तसेच आणखी सविस्तर माहितीसाठी खालील वेबसाईटला भेट द्या.   

                     

 A) https://www.mutualfundssahihai.com,  

  

 B) https://www.amfiindia.com,


C)https://www.thtslook.com/2023/10/1CroreMutualFund.html  आणि 


D)  https://www.camsonline.com इत्यादी. 


१५) म्युच्युअल फंड वितरक म्हणून कसे काम करावे? आणि प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि परवाना कसा मिळवावा? याबद्दल

पण वरील वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे. 


१६) डायरेक्ट म्युच्युअल फंड काढण्यासाठी Zerodha Aap, Groww App, 5 Paisa app, myCAMS aap इत्यादी aap मार्फत आणि म्युच्युअल फंडनुसार त्यांच्या वेबसाईट आणि बँकेमार्फत सुद्धा गुंतवणूक करू शकत आहे. 


१७) A] Step up Sip Calculator आणि B] Sip Calculator खालील लिंकवर क्लिक करून आपल्या गुंतवणुकीचा हिशोब करून पाहा.


● A ] मासिक Sip + १० वार्षिक वाढ हिशोब - https://groww.in/calculators/step-up-sip-calculator


● B ] मासिक Sip आणि लं पसम गुंतवणूक हिशोब - https://groww.in/calculators/sip-calculator 


१८) माझ्या MF पोर्टफोलिओतील Gr : Holding एकूण ६ वर्ष पूर्ण झाले आहेत.


१) Baroda BNP Paribas Mid Cap Fund  - 21.77%.

२) DSP Equity Opportunities Fund  - 50.1%.

३) HDFC Mid Cap opportunities fund - 26.43%.

४) Kotak Flexi Cap Fund - 15.73%,

५) Nippon India Multi cap Fund - 24.51%

६) Aditya Birla Sun Life - 30.32 %

इत्यादी. 
Image Secure investify.in


१९) वारंवार विचारले जाणारे प्रश्न


मी SIP मध्ये किती गुंतवणूक करू शकतो? एसआयपीमध्ये तुम्ही किती रक्कम गुंतवू शकता याची मर्यादा नाही. तुम्ही गुंतवू शकता ती किमान रक्कम रु. ५०० प्रति महिना. 

SIP चा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? एसआयपीचा कमाल कालावधी नाही. तुम्ही जोपर्यंत जमेल तेवढी गुंतवणूक करू शकता. तुम्ही किमान कार्यकाळ 3 वर्षांसाठी घेऊ शकता.                                       

एसआयपी म्युच्युअल फंडासारख्याच आहेत का? लोक सहसा SIP ला म्युच्युअल फंड किंवा म्युच्युअल फंडापेक्षा वेगळे समजतात. वस्तुस्थिती अशी आहे की SIP ही केवळ गुंतवणुकीची एक शैली आहे आणि निधी/योजना किंवा स्टॉक/गुंतवणुकीचा मार्ग नाही. तुमच्या आवडीच्या फंड/योजनेत वेळोवेळी गुंतवणूक करणे हे एक गुंतवणुकीचे साधन आहे.          मी माझी SIP रक्कम बदलू शकतो का? होय, तुम्ही कधीही एसआयपी गुंतवणूक कॅल्क्युलेटरसह तुमचा परतावा तपासू शकता आणि एसआयपी रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता                                                                           

SIP फक्त इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणुकीला परवानगी देते का? नाही, तुम्ही SIP द्वारे डेट आणि हायब्रीड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता.

SIP चे प्रकार कोणते उपलब्ध आहेत? बाजारात विविध प्रकारचे SIP उपलब्ध आहेत जसे की -

  • स्टेप-अप किंवा टॉप-अप एसआयपी: एक स्टेप-अप किंवा टॉप-अप एसआयपी तुम्हाला ठराविक अंतराने विशिष्ट रक्कम किंवा टक्केवारीने गुंतवणुकीची रक्कम आपोआप वाढविण्यास सक्षम करते.

  • शाश्वत एसआयपी: एक शाश्वत एसआयपी तुम्हाला कोणत्याही अंतिम तारखेशिवाय तुमची इच्छा असेल तोपर्यंत गुंतवणूक करत राहण्यास सक्षम करते.

  • ट्रिगर एसआयपी: ट्रिगर एसआयपी तुम्हाला विशिष्ट निर्देशांक स्तर, एनएव्ही , तारीख किंवा इव्हेंट दरम्यान गुंतवणूक सुरू करू देते.

लवचिक एसआयपी : एक लवचिक एसआयपी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुंतवणूक करत असलेली रक्कम बदलू देते. 

मी एसआयपीचे नूतनीकरण करू शकतो का?                                                                                 

होय, तुम्ही एसआयपी आपोआप रिन्यू करू शकता. कंपन्या तुम्हाला हे ऑटो-नूतनीकरण वैशिष्ट्य रद्द करण्याचा पर्याय देखील देतात.

मी एसआयपीमधील माझी गुंतवणूक थांबवू शकतो का? 

होय, म्युच्युअल फंड कंपन्या तुमची SIP गुंतवणूक ठराविक कालावधीसाठी थांबवण्याचा पर्याय देखील देतात.

मी म्युच्युअल फंड swich करू शकतो का?                                                                                     

होय हा पर्याय पण उपलब्ध आहे. जर एखादा म्युच्युअल फंड चांगला परतवा देत नसेल आणि त्यांचा पोर्टफोलिओ चांगला नसेल तर आपण त्या फंडातील रक्कम दुसऱ्या फंदात Swich करून बदल करू शकत आहे.

२०) म्युच्युअल फंडाने त्यांचा पोर्टफोलिओ कसा बनवला आहे आणि त्यांच्या पोर्टफोलिओत कोणते Share Holding आहेत. हे पाहण्यासाठी खालील Moneycontrol Aap आणि वेबसाईट ला भेट द्या. Web Link - https://www.moneycontrol.com 

२१) रेग्युलर एसआयपी आणि डायरेक्ट एसआयपी मधील % चा असणारा फरक पण MoneyControl Aap आणि वेबसाईटवर पाहू शकत आहे.

२२) ५० लाखांचा टर्म इन्शुरन्स - काही निवडक म्युच्युअल फंड कंपन्या गुंतवणूकदारांना ही उत्तम ऑफर देत आहेत.  या कंपन्यांचा समावेश आहे- ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंड आणि रिलायन्स म्युच्युअल फंड आणि निप्पोन इंडिया म्युच्युअल फंड या कंपन्या इक्विटी, हायब्रिड आणि निश्चित उत्पन्न श्रेणीतील निवडक योजनांवर विनामूल्य मुदत विमा देत आहेत.

२३) सध्या जर तुम्ही म्युच्युअल फंड्सची रेग्युलर एसआयपी करत असाल तर ती एक फॉर्म भरून डायरेक्ट एसआयपी मध्ये बदलू शकत आहात. ही प्रक्रिया अगदी साधी आणि सरळ असते; परंतु आपणाला त्याची पुरेशी माहिती नसल्यामुळे आणि भितीपोटी आपण हा निर्णय घेण्यात दुर्लक्ष करून दिरंगाई करत असतो.


२४) CAMS म्हणजे कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस – SEBI - नोंदणीकृत रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर (R&T) एजन्सी आहे. हे गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड कंपन्यांना तंत्रज्ञान-सक्षम प्रक्रिया उपाय प्रदान करत आहे. त्यामुळे Aap किंवा वेबसाईटवर ई-मेल आणि मोबाईल नंबर ने Log in केल्यावर तुम्हाला MF च्या NAV आणि Return बाबतीत बाबतीत इत्यंभूत माहिती मिळते. CAMS Website Link - https://www.camsonline.com .


२५) पैसे वाचवणे म्हणजेच पैसे कमावणे होय. त्यामुळे वरीलप्रमाणे रेग्युलर एसआयपी आणि डायरेक्ट एसआयपीमध्ये हे महत्वाचे फरक दिसतात.


२६) वरील माहिती ही माझ्या श्रोतानुसार उपलब्ध झालेली आहे. त्यानुसार माहितीमध्ये कमी अधिक प्रमाणात तफावत असू शकते.


२७) शेअर्स आणि म्युच्युअल फंड हे मार्केटनुसार आर्थिक जोखमीची बाब आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तींचा सल्ला जरूर घ्यावा. 


 
Post a Comment

0 Comments

close