Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Banking Ombudsman - RBI | बँक अधिकारी कधीच त्रास देणार नाही त्यासाठी हे करा । तुमच्या बँकेची आरबीआय बँकिंग लोकपालाकडे तक्रार कशी दाखल करावी?



तुमच्या बँकेची आरबीआय बँकिंग लोकपालाकडे तक्रार कशी दाखल करावी?



Banking Ombudsman - Reserve Bank of India

बँकिंग व बँक लोकपाल यांच्याकडे तुमची तक्रारी कशा सादर करायच्या हे जाणून घेणार आहोत. एक ग्राहक या नात्याने तुमच्या दैनंदिन बँकिंग सेवांमध्ये तुम्हाला एटीएम मधून पैसे काढताना पैसे मशीन मधून पैसे बाहेर न येणे, पूर्व सूचना दिल्याशिवाय आकार लावणे, क्रेडिट कार्ड संबंधित प्रश्न इत्यादी अडचणी येत असल्यास असे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचे प्रथम बँक अधिकाऱ्यांशी लेखी संपर्क करून तक्रार दाखल करा. . त्याचे तिकडे निराकरण न झाल्यास तुमच्या तक्रारीचे निराकरण खालील प्रकारे करा.


सर्वात आधी बँकेकडे तक्रार करा - 


१) तुमच्या बँक शाखेत ठेवलेल्या तक्रार नोंदवहीत तक्रार दाखल करा. बँक अधिकारी यांनी तक्रार वही न दिल्यास तिची मागणी करा किंवा त्या बँकेच्या वेबसाईटवरून ऑनलाईन तक्रार पाठवा.

२) तक्रार निवारणासाठी संपर्क करावयाच्या अधिकाऱ्यांची नावे शाखेमध्ये प्रदर्शित केली नसल्यास त्याची मागणी करा. तक्रार निवारणासाठी बँकांमध्ये एक मॉडेल अधिकारी नेमलेला असतो.


बँकिंग लोकपालाकडे तक्रार करणे -


१) तुमच्या बँकेने एक महिन्याच्या आत तुमच्या तक्रारीचे निवारण न केल्यास भारतीय रिझर्व बँकेच्या बँकिंग लोकपालाकडे तुमची तक्रार दाखल करा. भारतीय रिझर्व बँक लोकपाल योजना तुमच्या तक्रारीचे निवारण ताबडतोब व निशुल्क करते. बँकिंग लोकपालाच्या अधिकाऱ्याखाली बँकिंग सेवांमध्ये अनेक त्रुटींचा समावेश केलेला आहे.


२) एखादी तक्रार ऑनलाईन दाखल करावयाची असल्यास https://bankingombudsman.rbi.org.in ला भेट देऊन कम्प्लीट फॉर्मवर क्लिक करा. तुमची तक्रार योग्य रीतीने दाखल करण्यासाठी शक्यतो बँकिंग लोकपाल योजनेमध्ये दिलेला तक्रार फॉर्मस वापरा. ही योजना तिचे अधिकार क्षेत्र व लोकपालांचे पत्ते,  https://bankingombudsman.rbi.org.in ह्या वेबसाईटवर वर उपलब्ध आहे. 


अधिक माहितीसाठी कृपया अधिक माहितीसाठी बँकिंग लोकपाल यांच्या वेबसाइटला भेट द्या. .



अधिक माहितीसाठी बँकिंग लोकपाल यांच्या वेबसाइटला भेट द्या - येथे क्लिक करा



वित्तीय साक्षरता समृद्धीचा महामार्ग

























Post a Comment

0 Comments

close