Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पंतप्रधान मुद्रा योजना : किती आणि कसे मिळेल कर्ज? वाचा सविस्तर माहिती

 



पंतप्रधान मुद्रा योजना : किती आणि कसे मिळेल कर्ज? वाचा सविस्तर माहिती






प्रधानमंत्री मुद्रा योजना सन २०१५- १६ च्या अर्थसंकल्पामध्ये २० हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करून मुद्रा बँक उभारणीचे घोषणा करण्यात आलेली आहे. त्यांच्या अंतर्गत ३००० हजार कोटी रुपयांचा पत हमी निधी उभारण्याचे घोषणा करण्यात आली आहे. मुद्रा बँकेची कंपनी म्हणून मार्च २०१५ मध्ये कंपनी कायदा २०१३ अंतर्गत आणि बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून ७ एप्रिल २०१५ ला रिझर्व बँक कायदा १९३४ अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे.  मुद्रा ही एक सूक्ष्म एककांच्या विकास पुनर्वित्त पुरवठ्यासाठी भारत सरकारने स्थापित केलेली आहे. या योजनेची घोषणा विशेष २०१६ च्या केंद्रीय अंदाज पत्रकामध्ये अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. या मुद्रा योजनेचा उद्देश नॉन कॉर्पोरेट, नवीन व्यवसायिक, लघु व्यावसायिक क्षेत्रात वित्त पुरवठा करणे असा आहे. पंतप्रधान मुद्रा योजनेत रुपये १ लाख २३ हजार ४२५.४० करोड रुवयांचे कर्ज वाटप हे २०२१ - २२ पर्यंत छोट्या व्यवसायांना कर्ज मंजूर करण्यात आले आहे.


उद्देश


केंद्र सरकारची मुद्रा योजनेची दोन वैशिष्ट्ये आहेत. प्रथम स्वयंरोजगारासाठी सोपे कर्ज दुसरे म्हणजे छोट्या उद्योगांद्वारे रोजगार निर्माण करणे होय. आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला भांडवलाची समस्या देखील येत असेल तर आपण आपले स्वप्न केंद्र सरकारच्या पीएमएमवाय बरोबर साकार करू शकता. सुलभ कर्ज मिळवण्यास लोकांना मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगारासाठी प्रेरित केले जाईल असा सरकारचा विचार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होतील. मुद्रा योजनेपूर्वी छोट्या उद्योगांसाठी बँकेतून कर्ज घेण्यासाठी बऱ्याच औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. कर्ज हमी देखील आवश्यक होती. यामुळे बऱ्याच लोकांना उद्यम सुरू करायचा राहून जात असे.त्याचे महत्वाचे कारण म्हणजे बँकेकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असे. पंतप्रधान मुद्रा योजना पीएमएमवायचे पूर्ण नाव मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रेट रिफायनान्स एजन्सी असे आहे.




बँकेत अधिकारी अडवणूक करत आहेत तर इकडे तक्रार दाखल करा




कर्जाचे प्रकार -


 १) शिशु कर्ज -  शिशु कर्जाच्या खाली ५० हजार रुपयांचे कर्ज दिले जाते.

२) किशोर कर्ज - ५० हजार ते ५  लाखापर्यंतची कर्ज किशोर

कर्जाअंतर्गत दिली जातात.

३) तरुण कर्ज - तरुण कर्जाखाली ५ लाख ते १० लाखापर्यंतची कर्ज दिले

जातात.


फायदे - 


मुद्रा योजना म्हणजे पीएमएमवाय अंतर्गत हमी शिवाय कर्ज दिले जात आहे. याशिवाय कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. मुद्रा योजनेत कर्जाची परतफेड कालावधी पाच वर्षापर्यंत वाढवता येईल. सर्व अर्जदार अर्थात कर्जदारांना मुद्रा कार्ड मिळते. ज्याच्या मदतीने व्यवसायाच्या गरजेवर खर्च करता येतो.


प्रधानमंत्री मुद्रा योजना विषयी 21 मध्ये कसा अर्ज करावा?


पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत आपला उद्योग सुरू करण्यासाठी जर तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला खाली दिलेली पद्धत वापरावी लागेल.


● सर्वप्रथम या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदार संबंधित

बँकेकडून अर्ज भरावा लागेल.

● त्यानंतर अर्ज जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर

इत्यादी सर्व माहिती भरावी लागेल.

● आणि सर्व कागदपत्रे संबंधित बँकेकडे जमा करावी लागतील.

● त्यानंतर बँक अधिकारी आपला अर्ज, कागदपत्रे पाहून कर्जाची

रक्कम एक महिन्याच्या आत आपल्या बँक खात्यात जमा करतील.



पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेच्या सरकारी वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा आणि अधिक माहिती जाणून घ्या



बँकेच्या शाखा व्यवस्थापक तुमच्याकडून तुमच्या उद्योगासंबंधी संपूर्ण माहिती घेईल. त्या आधारावर तुम्हाला पीएमएमवाय योजनेच्या माध्यमातून कर्ज मंजूर केले जाईल. उद्योगाच्या स्वरूपाच्या हिशोबाने शाखाप्रमुख तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यास सांगू शकतो. पी एम एम वाय विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही या योजनेच्या अधिकृत सरकारी वेबसाईट http://www.mjdra.org.in/  ला भेट देऊ शकत आहे.



अशा प्रकारे आपला अर्ज पूर्ण होईल आणि आपण प्राप्त कर्जाच्या रकमेवर आपला उद्योग सुरू करण्यास सक्षम असाल.




तुमचा सिबील स्कोर मोफत तपासा अन्यथा कर्ज मिळणार नाही येथे क्लिक करून पहा.




अशा प्रकारे आपण पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेऊ शकतो. परंतु अनेक वेळा मुद्रा योजनेचे लाभ घेणारे किंवा लघुउद्योजक नवीन उद्योग सुरू करणारे तरुण कुठलीही माहिती न घेता अपूर्ण कागदपत्रे, अपूर्ण अर्ज भरून बँकेत सादर करतात. आपल्या अर्जाला आवश्यक ती कागदपत्रे कोणती आहेत?  किंवा कोणती कागदपत्रे कमी आहेत? ती सबमिट करण्यास दुर्लक्ष करतात. बँकेत कर्जासाठी वेळोवेळी पाठपुरा करणे आवश्यक आहे. जी आवश्यक कागदपत्रे लागतात ती बँकेत सबमिट करणे महत्त्वाचे आहे.  त्यानंतर बँकेने कर्ज नाकारले तर वरिष्ठ पातळीवरती आपण तक्रार दाखल करू शकता. तसेच आरबीआय कडे सुद्धा तक्रार दाखल करण्याचा अधिकार आपणास आहे.  मुद्रा कर्जाचा जर नकार मिळाला तर तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे सुद्धा दात मागू शकत आहे.

धन्यवाद !




तुम्हाला मेडिक्लेम इन्शुरन्स मिळणार नाही काय असेल कारण ? येथे क्लिक करून वाचा















Post a Comment

0 Comments

close