Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड ची नोंद आहे ? या सोप्या पद्धतीने लगेच तपासून पहा




तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड ची नोंद आहे ? या सोप्या पद्धतीने लगेच तपासून पहा





आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आणि ओळखपत्र आहे. बँक खाते उघडण्यापासून ते इतर महत्त्वाचे व्यवहार करताना आधार कार्ड ची गरज असते. आधार कार्ड हे कोणत्याही ठिकाणी पत्ता आणि ओळखपत्र किंवा इतर गोष्टीचा पुरावा म्हणून सादर करण्यासाठी विश्वासार्ह सरकारी कागदपत्र मानले जाते आहे. आपण अनेकदा आधार कार्ड चे झेरॉक्स किंवा आधार कार्ड पुरावा म्हणून सादर करत असतो. त्यावेळी समोरच्या व्यक्तीकडे तुमच्या आधार कार्डची माहिती जमा होते. अशावेळी तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापर होऊ शकतो किंवा तुमच्या आधार कार्डचा वापर करून कोणी सिमकार्ड विकत घेऊ शकते. त्यामुळे अशा गोष्टींपासून सावध करण्यासाठी सरकारने एक पोर्टल सुरू केलेले आहे. रिपोर्टर डिपार्टमेंट ऑफ टेली कम्युनिकेशन (TAFCOP)  कडून लॉन्च करण्यात आलेले आहे.



तुमच्या बँकेतील अधिकारी त्रास देत आहेत तर येथे क्लिक करून तक्रार दाखल करा




ही पद्धत वापरून आधार कार्ड वर किती सिम कार्डशी नोंद आहे तपासून पहा


१) TAFCOP ची अधिकृत वेबसाईट उघडा.

२)  त्यानंतर तिथे मोबाईल नंबर विचारण्यात आलेल्या पर्यायावर क्लिक करा.

३)आणि मोबाईल नंबर टाका आणि OTP पाठवण्याच्या पर्यावर क्लिक करा.

४) तुम्हाला OTP येईल तो वेबसाईटवर टाकून सेंड करा.

५) यानंतर तुमच्या समोर तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्डची नोंद आहे त्याची यादी दिसेल.



तुम्हाला जर यादीत इतर अनोळखी नंबर दिसले आणि ते नंबर तुम्ही किंवा घरातील व्यक्ती वापरत नसेल. तर तो या यादीतून काढून टाकण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच तुम्ही या अनोळखी नंबरला रिपोर्ट करू शकत आहे. यासाठी वेबसाईटवर डाव्या कोपऱ्यात असणाऱ्या चेक बॉक्सवर क्लिक करा. त्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडरला संपर्क साधून सूचना करा. यानंतर तुम्ही अनोळखी नंबरचे सिम कार्ड रिपोर्ट करू शकत आहे.


तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड ची नोंद आहे ? या सोप्या पद्धतीने लगेच तपासून पहा त्यासाठी येथे क्लिक करा








Post a Comment

0 Comments

close