Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

यूपीआय पेमेंट चुकीच्या बँक खात्यावर गेल्यास पैसे परत कसे मिळवायचे जाणून घ्या

 



यूपीआय पेमेंट चुकीच्या बँक खात्यावर गेल्यास पैसे परत कसे मिळवायचे जाणून घ्या





यूपीआय पेमेंट म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे कोणताही व्यवहार लवकर होतो.

 


⚫  यूपीआय (UPI) म्हणजेच काय ?

⚫  यूपीआय (UPI) म्हणजेच काय ?

⚫  रिझर्व बँकेच्या सूचना काय सांगतात ?

⚫  गेलेल्या पेमेंटचे पैसे परत मिळवण्यासाठी

⚫  NPCI तक्रार कशी करावी?




पुणे : आता डिजिटल व्यवहाराला केंद्र सरकारने जास्त प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे मोबाईल वरून मोबाईल वर पैसे पाठवणे अगदी सोपं आहे. शिवाय या पद्धतीने केलेल्या व्यवहाराला कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. एटीएम, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग यांच्यामुळे व्यवहार सोपे झाले आहेत. यूपीआयच्या सोयीमुळे त्यात गतिमानता आलेली आहे. तसेच कोणालाही कोणत्याही वेळी व देशाच्या कोणत्याही भागात पैसे पाठवणे अगदी सोयीचे झाले आहे. इंटरनेट असेल तर यूपीआय पेमेंट हा पैशांच्या व्यवहारासाठी अतिशय सोपा मार्ग असतो. मात्र काही वेळेला या पद्धतीने चुकीच्या व्यक्तीला पैसे जाण्याचा धोका असतो. अशावेळी पैसे परत कसे मिळवता येतील? याबाबत आज तक हिंदीने वृत्त दिलेला आहे. आज आपण ते पाहणार आहोत.




तुमचा सीबील स्कोअर पहा मोफत त्यासाठी येथे क्लिक करा..




यूपीआय (UPI) म्हणजेच काय ?

यूपीआय (UPI) म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे कोणताही व्यवहार पटकन होतो. ऑनलाईन खरेदी असो किंवा किराणा, भाजी, आणि कपडे घ्यायचे असो यूपीआय द्वारे पैसे देता येतात. मात्र काही वेळेला घाईगडबडीत चुकीच्या किंवा क्यूआर कोडला पैसे पाठवल्याने किंवा चुकीच्या मोबाईल क्रमांकाला पैसे पाठवल्याने ग्राहक अडचणीत येऊ शकतात. या अडचणी निर्माण झाल्या तर त्या सोडवण्यासाठी ग्राहकांकडे काही पर्याय उपलब्ध असतात. आज आपण त्या बाबतीत सविस्तर माहिती घेऊ या.



रिझर्व बँकेच्या सूचना काय सांगतात ?


ग्राहकांकडून चुकीच्या व्यक्तीला किंवा बँकत पैसे पाठवले गेले तर या bankingombudsman.rbi.org.in वेबसाईटवर तक्रार नोंदवता येते. पैसे परत मिळवण्यासाठी संबंधित बँकेत अर्ज करावा लागतो. त्यामध्ये तुमच्या बँक खात्याची व चुकून पैसे पाठवलेल्या खात्याची माहिती द्यावी लागते. तुमच्याकडून चुकून कोणाला पैसे पाठवले गेले हे माहीत असेल व ती व्यक्ती तुम्हाला https://www.npci.org.in/ पैसे परत करत नसेल तर त्या व्यक्ती विरोधात एमपीसीआय (NPCI) च्या वेबसाईटवर तक्रार दाखल करता येते.



गेलेल्या पेमेंटचे पैसे परत मिळवण्यासाठी


चुकीच्या खात्यात गेलेल्या पेमेंटचे पैसे परत मिळवण्यासाठी खात्यातून पैसे घेण्याच्या व्यवहाराचा मेसेज उपयोगी पडू शकतो. तो डिलीट होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. Google pay, phone pay आणि paytm मध्ये रिफंडसाठी काही पर्याय असतात. त्या संदर्भात ग्राहक तक्रार दाखल करू शकतात. पेटीएम, जीपे आणि फोन पे या ॲपद्वारे जर पैसे पाठवले असतील तर कस्टमर सर्विसमध्ये जाऊन मदत मागता येते. तुम्हाला तशी तक्रारही दाखल करता येते. त्यानंतर बँकेच्या हेल्पलाइन क्रमांकावरही फोन करून मदत मिळवता येते.



NPCI तक्रार कशी करावी?


एमपीसीआय (NPCI) च्या वेबसाईटवर तक्रार दाखल करण्यासाठी प्रथम Get In Touch येथे क्लिक करा. पुढे UPI Complaint हा पर्याय दिसेल. त्यानंतर Dispute Redressal Mechanism इथे जाऊन स्क्रोल करावे. त्यात ट्रांजेक्शन (Transaction) असं बटन असेल ते क्लिक करावे. तिथे Nature of Transaction आणि त्या खाली Issue of Transaction,  Fraudulent Transaction, Comments, Transaction ID, Select Bank Name, व्यवहार झाल्याची तारीख, पैसे, ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अशी माहिती भरावी लागेल.  अशा पद्धतीने पेमेंट रिफंडसाठी अर्ज करता येऊ शकतो. 



NPCI तक्रार कशी करण्यासाठी येथे क्लिक करा 





UPI हा पैसे व्यवहारासाठी सोयीचा आणि सोपा मार्ग असला तरी त्यात अनेक धोके आहेत. चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवले गेले तर ते पैसे परत मिळवण्याचे काही पर्याय उपलब्ध असतात. उपाय वापरणाऱ्यांनी त्याची माहिती घेणे गरजेचे आहे. शक्यतो पैसे पाठवताना योग्य काळजी घेतली की पुढील धोका टळू शकतो.











Post a Comment

0 Comments

close