Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एसबीआय कार्ड असेल तर मिळेल २० लाख रुपयांचा मोफत विमा ; कसा कराल दावा दाखल ?





एसबीआय कार्ड असेल तर मिळेल २० लाख रुपयांचा मोफत विमा ; कसा कराल दावा दाखल ?





आज काल विमा म्हटलं की त्याचा प्रीमियम खूप असतो अशी अनेकांची समजूत असते. परंतु एसबीआयच्या एटीएम कार्ड सोबत तुम्हाला अपघात विमा हा मोफत मिळत आहे त्या विम्याची रक्कम ही एसबीआयच्या एटीएम कार्डाच्या श्रेणीनुसार ठरत असते.




हायलाईट्स 


● किती रुपयांचा विमा कव्हर मिळतो?

● विमा संरक्षण रक्कम कशी ठरते?

● खरेदी संरक्षण किती आहे?

● विम्याची माहिती कोठे आहे?

● कसा कराल दाखल दावा ?



किती रुपयांचा विमा कव्हर मिळतो? 


एसबीआयच्या एटीएम कार्ड सोबत तुम्हाला जो फ्री विम्याचा कव्हर मिळतो. तो 20 लाख रुपयांचा असतो तर कसा क्लेम कराल?


एसबीआयच्या बँक खातेधारकांना मिळणाऱ्या एटीएम कार्डाच्या मदतीने आपल्याला पैसे काढता येतात. त्याचप्रमाणे ऑनलाइन शॉपिंगची बिले भरता येतात. परंतु तुम्हाला याच एटीएम कार्डवर अपघाती विमा सुद्धा असतो हे माहिती आहे का ? हाच अपघाती विमा हा मोफत असतो. परंतु अनेकांना याची माहिती नसल्याने ग्राहक या विम्याच्या कव्हरचा लाभ घेत नाही. पदरचे पैसे मोजून उपचार घेतले जातात किंवा अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला ही माहिती नसल्याने त्यांचेही खूप मोठे नुकसान होत असते.


विमा संरक्षण रक्कम कशी ठरते? 


एटीएम (ATM) कार्ड सोबत तुम्हाला अपघाती विम्याची सुरक्षा मोफत दिली जात आहे. त्या त्या कार्डाच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम ठरत असते. उदाहरण पहायचे झाले तर देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय (SBI) ची माहिती घेऊयात. एसबीआयच्या ग्राहकांना एटीएम कार्डवर २० लाख रुपयाचा अपघाती विमा देत आहे.


खरेदी संरक्षण किती आहे? 


या धोरणामध्ये चोरी/घरफोडी/घरफोडीमुळे खरेदी केलेल्या वस्तू/वस्तूंचे नुकसान (नाशवंत वस्तू, दागिने, मौल्यवान दगड वगळता) अशा वस्तूंच्या खरेदीच्या ९० दिवसांच्या आत वाहनातून चोरीचा समावेश आहे. पॉइंट ऑफ सेल/व्यापारी आस्थापनांवर पात्र डेबिट कार्ड प्रकार वापरून खरेदी केलेल्या वस्तूला विमा संरक्षण मिळेल.


 डेबिट कार्ड प्रकार

 सुरक्षा कवच रु. मध्ये खरेदी केले.

 SBI गोल्ड (मास्टरकार्ड/व्हिसा)

 ५,०००/-


 SBI प्लॅटिनम (मास्टरकार्ड/व्हिसा)

 ५०,०००/-


 SBI प्राइड (बिझनेस डेबिट)(मास्टरकार्ड/व्हिसा)

 ५,०००/-


 SBI प्रीमियम (बिझनेस डेबिट)(मास्टरकार्ड/व्हिसा)

 ५०,०००/-


 SBI व्हिसा स्वाक्षरी डेबिट कार्ड

 1,00,000/-


विम्याची माहिती कोठे आहे?


एसबीआय बँकेच्या वेबसाईटवर सदर माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार एसबीआय डेबिट कार्डधारकांना मोफत विमा संरक्षण मिळत आहे. हे विमा संरक्षण 25000 ते 20 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते. एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम ठरवली जाते. विम्याचा क्लेम करण्यासाठी फक्त एकच साधी अट आहे. ती म्हणजे अपघाताच्या तारखेपासून ९० दिवसांच्या आधी एटीएम मशीन किंवा पीओएस ई-कॉमर्स वर किमान एकदा एटीएम कार्ड वापरले गेलेले पाहिजे.



फोन पे आणि गुगल पे वरून चुकीच्या व्यक्तीला पैसे गेले असेल तर हे काम करा तुमचे सर्व पैसे परत मिळतील त्यासाठी येथे क्लिक करा



एसीबीआय डेबिट कार्ड धारकाचा अपघातात आणि विमान अपघातात मृत्यू झाल्यास एटीएम कार्डवर उपलब्ध विमा संरक्षणाचा लाभ मिळतो. डेबिट कार्ड वापरून विमानाचे तिकीट खरेदी केले असेल तर तुम्हाला विमान अपघातात दावा दाखल करता येतो.  कार्डधारकाचा त्यात मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला विमा रक्कम मिळते.


कसा कराल दाखल दावा ?


दावा दाखल करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जावे लागेल. कार्ड धारकाचा मृत्यू झाला असेल तर कार्ड धारकाच्या नॉमिनीला म्हणजे वारसाला बँकेच्या शाखेत जावे लागते. बँकेत जाऊन विहित नमुना अर्ज भरून द्यावा लागेल. आवश्यक ती सर्व कागदपत्रे बँकेत जमा करून पूर्तता करावी लागेल. अपघाताच्या ४५ दिवसांच्या आत कार्ड धारकाला बँकेत जाऊन दावा दाखल करावा लागेल तरच विमा दावा मंजूर होईल.






Post a Comment

0 Comments

close