Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Online Shopping Frauds : मागवला होता मोबाईल आणि आले कांदे कंपनीकडून रिफंड पण नाही, अशावेळी तक्रार कोठे दाखल करावी?




 Online Shopping Frauds : मागवला होता मोबाईल आणि आले कांदे कंपनीकडून रिफंड पण नाही, अशावेळी तक्रार कोठे दाखल करावी?




 हायलाईट्स  - 

● खरेदी केला मोबाईल आले दगड, बटाटे, कांदे ?
● ऑनलाइन शॉपिंग मध्ये फसवणूक ची तक्रार कशी?
● सरकारी तक्रार निवारण पोर्टल
● निवडक ई-कॉमर्स साइटवरूनच खरेदी करा
● ग्राहक न्यायालय एक पर्याय



जर तुम्ही सुद्धा ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूकीला बळी पडत असाल आणि तुम्हाला परतावा मिळण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही त्याबद्दल माहिती घेऊन नक्कीच तक्रार करू शकत आहात.




खरेदी केला मोबाईल आले दगड, बटाटे, कांदे ?


सध्या देशामध्ये डिजिटल युग चालू झालेले आहे. त्यामुळे देशांतर्गत ऑनलाइन शॉपिंग दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याच्या काळात लोक ई-कॉमर्स साइटवरून किंवा त्यांच्या ऐप वरून मोबाईल, लॅपटॉप, फॅब्रिक्सह अनेक महागड्या वस्तू ऑर्डर करत असतात. मात्र यासोबत फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. ग्राहकाने ऑर्डर केलेल्या वस्तूंच्या ऐवजी दुसरे काहीतरी उत्पादन आढळून आल्याचे अनेक वेळा दिसून आलेले आहे. काही प्रकरणांमध्ये पॅक बॉक्स रिकामा आढळला तर काही प्रकरणांमध्ये कचरा, दगड, बटाटे आणि कांदे अशा प्रकारच्या वस्तू आढळत आहेत.



सरकार देणार २५ वर्षे मोफत वीज ? त्यासाठी येथे क्लिक करा



ऑनलाइन फसवणुकीशी संबंधित अशा तक्रारी देशभरातून वाढत आहेत. वास्तविक अशा फसवणुकीच्या घटनांसाठी विक्रेता, शिपिंग कंपनी यापैकी कोणीही जबाबदार असू शकतात. मात्र यामुळे सर्वाधिक नुकसान हे वस्तु खरेदी करणाऱ्या ग्राहकांचेच होत आहे. कारण वस्तू वेळेवर मिळत नाही आणि पेमेंट केलेले पैसे सुद्धा रिफंड मिळवण्यासाठी खूप त्रासदायक प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे.



ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूकीची तक्रार कशी करावी ?


तुम्ही अशा प्रकारच्या फसवण्याला पळी पडत असाल तर तुम्हाला पैसे परत मिळण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार निश्चितच करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला ई-कॉमर्स वेबसाईट किंवा विक्रेत्याशी संपर्क साधावा लागेल. तुम्ही कंपनीच्या कस्टमर केअर विभागाशी संपर्क करून तुमची तक्रार नोंदवू शकत आहे. मात्र निर्धारित वेळेत तुमची तक्रार, समस्या दूर झाली नाही, तर तुम्ही पुढे तक्रार करू शकत आहे.  वास्तविक जर तुम्ही बनावट किंवा बोगस वेबसाइट किवा एप वरून खरेदी केली असेल तर पैसे मिळणे जवळपास अशक्य होते.




ई कॉमर्स वेबसाईटची निवारण यंत्रणा काम करत नसेल तर कंपनीच्या सोशल मीडिया पेजवर तक्रार करण्यास अजिबात घाबरू नये किंवा संकोच बाळगू नये.



सरकारी तक्रार निवारण पोर्टल

याशिवाय सरकारच्या तक्रार निवारण पोर्टल INGRAM ( Integrated Grievance Redressal Mechanism) वर सुद्धा तक्रार दाखल करा. Consumerhelpline.gov.in या ग्राहक व्यवहार साइटवरही तुम्ही तुमचा मुद्दा आणि प्रश्न मांडू शकत आहे. 




राष्ट्रीय उपभोक्ता हेल्पलाइन (एनसीएच) या ग्राहक व्यवहार साइटवरही तुम्ही तुमचा मुद्दा आणि प्रश्न मांडू शकत आहे त्यासाठी येथे क्लिक करा.





ग्राहक न्यायालय एक सक्षम पर्याय

त्याचबरोबर ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊ शकत आहे. अनेक प्रकरणांमध्ये ग्राहक न्यायालयांनी ग्राहकांच्या हिताचे चांगले आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय दिलेले आहेत. अनेक प्रकरणात निष्काळजीपणासाठी कंपन्यांना दंड केलेला आहे. नॅशनल कंजूमर हेल्पलाइन असा सल्ला देते की चुकीचे व्यवहार किंवा ऑनलाईन फसवणूक झाल्यास कंपनी दखल घेत नसेल तर ग्राहकाने या FIR दाखल करावा त्यासाठी पोलीस स्टेशनला किंवा सायबर सेलकडे तक्रार दाखल करावी.



निवडक ई-कॉमर्स साइटवरूनच खरेदी करा


ऑनलाईन फसवणूक टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बाजारात सध्या असलेला नामांकित ई - कॉमर्स प्लॅटफॉर्मवरूनच खरेदी करणे आवश्यक आहे. याचा फायदा असा होईल की तुम्हाला अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही. गेल्या काही काळापासून लोकांमध्ये ऑनलाईन शॉपिंगची क्रेज पाहता सायबर गुन्हेगार लोकांना आपले लक्ष बनवत आहेत. स्वस्त दरात मोबाईलच्या देत आहोत असे भासवून डिलिव्हरीच्या वेळी पॅकिंग बॉक्समध्ये बटाटा, दगड, साबण किंवा कांदे देऊन ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करणारी टोळी देशभरात सक्रिय आहे. या टोळीने देशभरात अनेकांना आपले लक्ष बनवून बळी बनवले आहे. उत्पादनांची ऑनलाइन ऑर्डर दिल्यानंतर डिलिव्हरीच्या वेळी सर्वप्रथम डिलिव्हरी बॉयसमोर पॅकेट उघडावे आणि उत्पादनाची तपासणी करून पहावे. 



 राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र येथे तक्रार दाखल करण्यासाठी येथे क्लिक करा .










Post a Comment

0 Comments

close