Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कर्जावर घेतलेली गाडीची (Car) चोरी झाल्यानंतर EMI भरावा लागत नाही ? काय आहे नियम सविस्तर माहिती करून घ्या



कर्जावर घेतलेली गाडीची (Car) चोरी झाल्यानंतर EMI भरावा लागत नाही ? काय आहे नियम सविस्तर माहिती करून घ्या  


◆ ईएमआय भरावा लागणार की नाही ?

◆  इन्शुरन्स कंपनीला बँकेकडून घेतलेल्या कर्जाची माहिती असते का?

◆ इन्शुरन्स कंपनीने क्लेम नाकारला तर काय करावे?



Car Loan EMI : नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या काही जणांची इच्छा असते की दारात नवी कोरी गाडी (Car) असावी. पण ज्या कमाईत महागडी गाडी घेणे प्रत्येकालाच परवडत असते असे नाही. अनेक जण गाडी घेण्याच स्वप्न बाळगून असतात. अनेक जण गादीवर कर्ज घेण्याचा पर्याय निवडतात. स्वस्त गाडीची किंमत ४ ते ६ लाखाच्या घरात असते. जर कर्ज आणि त्याचा होता (EMI) यांचे गणित बसले की मग गाडी विकत घेण्यासाठी पुढाकार घेतात.


 मूळ रक्कम किंवा आगाऊ रक्षक भरल्यानंतर गाडी दारात उभी राहते. आणि गाडीसाठी घेतलेल्या बँकेच्या कर्जाचे हप्ते फेडण्यास सुरुवात होते. दर महिन्याला न चुकता गाडीचा हप्ता भरला जातो. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का ? कर्जाचे हप्ते पेडण्यापूर्वीच गाडी चोरी गेलेली आहे किंवा चोरी झाली तर अशा परिस्थितीत हप्ता (ईएमआय) भरणे गरजेचे असते.  की त्यातून सुटका होते याबाबत अनेकांना संभ्रम आहे. 


चला तर आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊया नेमकं काय करावं लागणार आहे. हप्ता भरावा लागणार की नाही तुम्ही तुमची गाडी  कर्जावर घेतली असेल तर तुम्हाला हप्ता(ईएमआय) भरावाच लागतो. म्हणजेच गाडी चोरीला गेली तरी कर्ज फेडावेच लागते. अशा स्थितीमध्ये इन्शुरन्स क्लेम तुमच्या कामी येऊ शकतो. जर तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये चोरीचा क्लेम कव्हर होत असेल तर तुम्ही क्लेम करू शकता. त्यानंतर इन्शुरन्स कंपनी तुमच्या गाडीचा इन्शुरन्स क्लेमच्या आधारे कर्जाचे पेमेंट करेल. कर्ज रक्कम भरल्यानंतर क्लेममधून जी रक्कम उरते ते पैसे तुम्हाला मिळतात. 



तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्डची नोंद आहे ?येथे क्लिक करून पहा.




इन्शुरन्स कंपनीला बँकेकडून घेतलेल्या कर्जाची माहिती असते का?


जेव्हा तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी घेतात तेव्हा तुमच्या गाडीवर कर्ज आहे की नाही हे विमा कंपनीला माहिती असते. कारण कर्ज देणाऱ्या बँकेचे नाव ज्या गाडीवर कर्ज घेतले आहे त्या गाडीच्या आरसी पुस्तकावर नोंदवलेले असते. त्यामुळे गाडीची चोरी झाल्यास किंवा गाडी (Car) चोरी गेल्यास विमा कंपनी तुमच्या दाव्याच्या आधारे कर्जाचे पैसे पहिल्यांदा बँकेला देते. पण तुमचा दावा नाकारला गेल्यास तुम्हाला कर्जाची रक्कम भरावी लागेल. तुम्ही कर्जाचे हप्ते चुकवल्यास बँक तुमच्यावर कारवाई करू शकते आणि दंडही होऊ शकतो.


विमा क्लेमच्या बाबतीत फसवणूक झाल्यास प्रथम विमा कंपनीशी संपर्क साधा


पॉलिसीमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास सर्वप्रथम तुम्ही त्या विमा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याशी (GRO) संपर्क साधावा. तुम्ही तुमची समस्या GRO ला लेखी तक्रार देऊन सांगू शकत आहे. तुमच्या तक्रारीवर विमा अधिकारी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील. विमा कंपनीकडून १५ दिवसात तुम्हाला कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्यास तुम्ही IRDA (आयआरडीए ) शी संपर्क साधू शकता. 


या चार मार्गाने IRDA (आयआरडीए) कडे तक्रार दाखल करा. 


१) IRDA (आयआरडीए ) च्या तक्रार निवारण कक्षाशी टोल फ्री क्रमांक १५५२५५ वर संपर्क साधता येईल.


२) तुम्ही तुमची तक्रार कागदपत्रे पुराव्यासह IRDA (आयआरडीए ) ला complaints@irdai.gov.in या मेलवर पाठवू शकता.


३) तुम्ही तुमची तक्रार पोस्टाद्वारे आयआरडीए (IRDA) कडे देखील पाठवू शकता.  पत्ता :-  महाव्यवस्थापक, भारतीय विमा नियमक आणि विकास प्राधिकरण ग्राहक व्यवहार विभाग - तक्रार निवारण कक्ष, सर्वेक्षण क्रमांक ११५/१, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट,  नानकरागुड, गच्चीबावली, हैदराबाद - ५०००३२.


४)  याशिवाय तुम्ही IRDA (आयआरडीए ) च्या वेबसाईटवर आयजीएमएस (IGMS) मध्ये तक्रार देखील नोंदवू शकत आहे.


तुमची तक्रार IRDA संबंधित विमा कंपनीकडे पाठवते. तक्रार संबंधित विमा कंपनीला विहित मुदतीत समस्या सोडवावी लागते. यानंतर तुम्ही विमा कंपनीच्या उत्तराने समाधान नसाल. तर तुम्ही विमा लोकपालाकडे तक्रार करू शकत आहे. लक्षात ठेवा की तक्रार नोंदवल्यानंतर लेखी पोच पावती किंवा रेफरन्स क्रमांक घेणे आवश्यक आहे.



पंतप्रधान मुद्रा कर्ज कसे मिळेल ? येथे क्लिक करा आणि वाचा



ग्राहक न्यायालयात सुद्धा दाद मागू शकता - 


जर एखाद्या कंपनी किंवा एजंटने तुमची फसवणूक केली तर तुम्ही ८१३०००९८०९ या क्रमांकावर एसएमएस (SMS) करून तुमची तक्रार दाखल करू शकत आहे.  एसएमएस( SMS)  व्यतिरिक्त तुम्ही टोल फ्री ग्राहक हेल्पलाइन नंबरवर तक्रार नोंदवू शकत आहे. तुमची तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही - १८०० ११ ४००० किंवा १४४०४ वर कॉल करू शकता.  एसएमएस (SMS) प्रमाणेच तुमची तक्रार येथे नोंदवली जाईल. येथे संभाव्य उपाय किंवा तुम्हाला पुढे काय करायचे आहे ही माहिती देखील दिली जाते. 




तुम्ही https://consumerhelpline.gov.in या पोर्टलवर तुमची तक्रार नोंदणी करू शकता. येथे तुम्ही तुमची तक्रार माहिती, कंपनीचे नाव, विवाद संबंधित कागदपत्रे देखील शेअर करू शकत आहे. वरील प्रक्रियेतून तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्ही थेट न्यायालयाचे दार ठेवू शकता.



सूचना : भारतीय कायदे हे आवश्यकते नुसार वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या वर्तमान कायद्यानुसार दिलेली आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदे तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा.







Post a Comment

0 Comments

close