Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होताना हे करा अन्यथा इन्शुरन्स मंजूर होणार नाही.



हॉस्पिटलमध्ये ऍडमिट हे करा अन्यथा बिल मंजूर होणार नाही.



Important: हॉस्पिटलायझेशन करत असाल तर संबंधित इन्शुरन्स कंपनीला कळवणे बंधनकारक आहे.


आज आपण पाहणार आहोत रुग्ण दवाखान्यात दाखल करताना किंवा दाखल झाल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते आहे. पण ही काळजी रुग्णाबाबत नाही तर मेडिक्लेम बाबत आहे, कारण रुग्णाची काळजी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि त्यांच्या नर्सेस घेत असतात. 





अनेक कामगार आणि ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी आणि अधिकारी हे वैयक्तिक किंवा ग्रुप मेडीकल इन्शुरन्स खरेदी करत असतात. अनेक ठिकाणी ज्या अस्थापनेत कर्मचारी काम करत आहेत, तेथील आस्थापना स्वतःच मेडिक्लेम इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करून कर्मचारी यांना लागू करत असतात.





जेंव्हा घरातील व्यक्ती आजारी असेल किंवा अपघातात काही दुखापत झाली असेल तेंव्हा दवाखान्यात दाखल ( ऍडमिट ) करताना खूप घाईघाईने सर्व घडत असते. अशा वेळेस विचार करायला सुध्दा वेळ मिळत नाही. त्यामुळे ऍडमिट करताना ज्या कंपनीचा इन्शुरन्स घेतला आहे, त्या इन्शुरन्स कंपनीला किंवा त्यांच्या TPA कंपनीला कळवायच असते तेच राहून जाते किंवा सूचना द्यायची राहून जाते. त्यामुळे जेंव्हा अंतिम खर्च रक्कम ( Bill ) भरायची वेळ येते तेंव्हा या गोष्टी लक्षात येतात. त्यावेळी सदर इन्शुरन्स कंपनी तुमचे बिल मजूर करत नाही. त्यामुळे रोख रक्कम भरणा करण्याची वेळ येऊ शकते. आणि तुम्ही जर रोख रक्कम भरली आणि नंतर बिल दाखल केले तर ते शुद्ध मंजूर होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे तुमचा मेडिक्लेम नामंजूर होऊ शकतो. 




● ज्यांच्याकडे मेडिक्लेम किंवा हेल्थ इन्शुरन्स आहे अशा सर्वांसाठी महत्त्वाचे
👇
IRDA (आय आर डी ए ) च्या नवीन नियमानुसार कोणत्याही कंपनीचा मेडिक्लेम इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल तर दवाखान्यामध्ये ऍडमिट (हॉस्पिटलायझेशन ) २४ तासाच्या आत मध्ये क्लेम रजिस्ट्रेशन म्हणजेच क्लेम इंटिमेशन करणे गरजेचे आहे. जर क्लेम रजिस्टर केला नाही तर क्लेम रिजेक्ट होण्याचे शक्यता आहे.

टोल फ्री नंबर, ई- मेल , व्हाट्सअप किंवा याद्वारे तुम्ही क्लेम रजिस्टर करू शकता.








Post a Comment

0 Comments

close