Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तुमचा ब्लॉग सुरू करा आणि निश्चितपणे लाखो रुपये कमवा | Start your own blog and definitely make millions

 स्वतःचा ब्लॉग सुरू करा आणि निश्चितपणे लाखो रुपये कमवा.


Immage Secure By -arjunsaid


अपना खुद का ब्लॉग शुरू करें और निश्चित रूप से लाखों कमाएँ 

                                 ब्लॉग म्हणजे काय प्रकार आहे ? आज आपण येथूनच सुरुवात करू या. कारण ब्लॉग म्हणजे काय आहे हे अनेकांना माहिती सुध्दा नाही. मग तो कसा आणि कोठे सुरू करायचा अशी प्राथमिक माहिती अनेकांना नसते. 

        ब्लॉग चालू करण्यासाठी कोणता पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी किती खर्च येतो आहे? ब्लॉग चालू केला तर त्यासाठी टेक्निकल मदत कोठून मिळेल. अशा प्रकारच्या माहितीबाबत तरुण अनभिज्ञ असतात. त्यामुळे Blog कडे अनेकजण दुर्लक्ष करत असतात. 

ब्लॉगच का? हा पण प्रश्न असतो. 

 

Start your own blog and definitely make millions

 

चला तर आता सविस्तरपणे काही महत्त्वाचे मुद्दे पाहू या. 

सध्या डिजिटल युग आहे आणि डिजिटल इंडिया मोहिम पण जोर धरत आहे. शासकीय पातळीवर डिजिटल स्टार्टअप आणि इतर मार्गांना जास्तीत जास्त प्रोजेक्ट केले जात आहे. कारण भविष्यात डिजिटल अर्थात इंटरनेट शिवाय पर्याय नाही. हे महत्वाचे कारण आहे. 

शिवाय आता भारतातील विचार करायचा म्हटले तरी भारताची लोकसंख्या १३० करोड च्या आसपास आहे. भारत हा विकसनशील देश म्हणून प्रगती करत आहे. ४G आणि ५G नेटवर्कमुळे इंटरनेटचा स्पीड वाढला आहे. त्यामुळे स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची आणि त्यातून इंटरनेट वापर करणाऱ्यांची संख्या करोडोंनी वाढत आहे.

आता जग २१ शतकाकडे वाटचाल करत आहे. आणि ह्या डिजिटल युगात शोषल मीडिया लोकांच्या जीवनाचा अभिन्न अंग झालेला आहे. लोकांची अर्थात तरुणांची दिवसाची सुरुवात आणि शेवट हा सोशल मिडिया Update पाहून होत आहे.

 

स्वतंत्र हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. त्यातूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्माण झाले आणि तो सर्वांचा हक्कच आहे. त्यामुळे पूर्वी पेक्षा आता व्यक्त व्हायला भरपूर माध्यमे उपलब्ध झालेली आहेत.  लोक पूर्वी रोज सकाळी वर्तमानपत्र वाचत असत. ह्या वर्तमान पत्राद्वारे अनेक डॉक्टर, वैज्ञानिक, राजकीय नेते, लेखक आणि विचारवंत आपले विचार मांडत असे. पण सामान्य लोकांना यामध्ये संधी उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे अनेकांना इकडे व्यक्त होण्यासाठी मर्यादा असत.

 

पण आता इंटरनेटमुळेसोशल मीडिया क्रांती झाली आहे. इंटरनेट मुळे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार, ज्ञान आणि माहिती संपूर्ण जगासमोर सहज आणि निशुल्क पोहोचवू शकत आहे.  ह्यासाठी Google Blogs, Youtube, आणि Facebook ह्या कंपन्यांनी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. 

 

वरिलप्रमाणे आपण ब्लॉग बाबत माहिती घेतली आहे. लोकांचे प्रश्न आणि अडचणी समाजासमोर मांडण्याचा आणि त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ब्लॉग हे अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक साधन आहे.

 

ब्लॉग म्हणजे काय हो? अहो हे एक माध्यम आहे. जसे पूर्वी आपण मासिक, साप्ताहिक, दिवाळी अंक आणि वर्तमानपत्र यामध्ये जसे लेख लिहायचो अगदी तसेच लेख किंवा माहिती इंटरनेटवर लिहिणे अर्थात ब्लॉगवर लिहिणे. म्हणजे हे एक प्रकारे तुमचे स्वतःचे वर्तमानपत्र किंवा साप्ताहिक आहे असेच समजा. त्याला तुम्ही तुम्हाला हवे तसे डिझाइन करा आणि हवे तसे सजवू शकत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर जसे की हा www.thtslook.comहा ब्लॉग ऑनलाइन पैसे कसे कमवायचे आणि टेक्निकल मदतीची माहिती मराठीत आणि तेही मोफत उपलब्ध करून देत आहे. 

 

Immage Secure By -pixabay.com



                              ब्लॉग लिहायला सुरुवात केल्यानंतर विषय निवडला जात नाही. तर तो अगोदरच निवडावा लागतो. तुम्हाला ज्या क्षेत्राची आवड आहे किंवा ज्या क्षेत्रातील ज्ञान आणि माहिती आहे. असाच विषय तुम्ही ब्लॉग साठी निवडू शकता. जसे की स्थानिक बातम्या, पाककला, बायोग्राफी, इतिहास, राजकीय, टेक्निकल आणि शेती यासह तुमचे स्वतःचे अनुभव सुध्दा लिहू शकत आहे. तुम्ही याबाबतीत गोंधलेले असाल तर कमेन्ट करून सांगा मी नक्कीच मदत करू शकतो आहे.

ब्लॉगिंग साठी सध्या ब्लॉगर हे google blog आणि Wordpress Blog ला प्राधान्यक्रम देत आहे. तुम्ही सुद्धा ह्या दोन्ही पैकी एक निवडून स्वतःचा ब्लॉग चालू करू शकत आहे. जगभरातील ब्लॉगर हे google ब्लॉग आणि wordpress ब्लॉग ह्या दोन्ही Site ला पसंती देत आहे.

ब्लॉग चालू करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि ब्लॉगसाठी प्राथमिक तयारी कोणती करावी हे पाहणार आहोत. 

१) विषय - Subject,

२) डोमेन नाव - Domain Name,

३) होस्टिंग - Hosting 

ब्लॉग नक्की कसा सुरू करायचा असतो याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

१) विषय - Subject 

ब्लॉग सुरू करण्याआधी तुम्ही ब्लॉग कोणत्या विषयावर लिहिणार आहेत हे ठरवून पक्के करावे. म्हणजे तुम्हाला लिहायला सहज सोपा असेल असा आवडीचा विषय नक्की करावा. मग त्यावर तुम्ही ब्लॉग लिहू शकत आहे.

२) डोमेन नाव - Domain Name 

डोमेन हा ब्लॉगचा मुख्य विषय आहे. डोमेन म्हणजे ब्लॉगचा पत्ता असतो. त्याला web Address असे म्हणतात. उदाहरणार्थ www.thtslook.com हे पण एक डोमेन नाव आहे. डोमेन नाव आकर्षक आणि खास असावे आणि ते इतरांच्यापेक्षा वेगळे असावे. हे डोमेन नाव कधीच एकसारखे नसते. आणि ते एकदाच वापरता येते. डोमेन नाव देणाऱ्या अनेक वेबसाईट आहेत. त्यामध्ये google, Godaddy, Bigrok आणि Hostinger ह्या Site डोमेन खरेदी करू शकत आहे. जर तुम्हाला डोमेनचा खर्च करायचा नसेल तर तुम्ही Free Sub Domain घेऊन ब्लॉग सुरू करू शकत आहे. असे डोमेन google Blog आणि वर्डप्रेसवर उपलब्ध आहेत. सब डोमेन म्हणजे तुम्ही ब्लॉग ला जे नाव दिले आहे किंवा जे डोमेन आहे त्याच्या पुढे bolgpost. com किंवा wordpress.com लागते. उदाहरणार्थ - mydomain.blogpost.com असे होईल. तुम्हाला खरंच ब्लॉग चालू करून पैसे कमवायचे असतील तर Domain घेणे कधीही चांगले असेल. पण सुरुवातीला शिकण्यासाठी sub domain चालेल. 

३) होस्टींग - Hosting

एकदा डोमेन घेतले की त्यासोबत होस्टिंग (Hosting) पण लागू शकते. डोमेन म्हणजे ब्लॉगचे नाव किंवा पत्ता असतो. आणि होस्टींग म्हणजे आपण आपला ब्लॉग किंवा वेबसाईट ठेवणार आहोत अशी ऑनलाइन अर्थात इंटरनेट वरील असणारी जागा होय. होस्टींग ची जागा देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्यातील Google, Godaddy, Host gator, Hostinger ह्या टॉप कंपनी आहेत. 

वरील प्रमाणे तिन्ही गोष्टी उपलब्ध करून घेतल्या की आपण ब्लॉग लिहायला आणि पब्लिश करायला तयार झालो आहे हे समजावे. आपण ज्याप्रमाणे fb page आणि Facebook वर पोस्ट लिहून पब्लिश करतो अगदी तसेच इकडे पोस्ट लिहून पब्लिश करायची असते. अगदी सहज सोपी गोष्ट आहे. 

काही दिवस जास्त संख्येने ब्लॉग लिहिले की तुम्ही google एडसेन्स साठी अप्लाय करू शकत आहे. किंवा Facebook वर Instant आर्टिकल साठी अप्लाय करू शकत आहे. त्यासाठी त्यांच्या काही गाईड लाईन आणि टर्म्स आणि कंडिशन आहेत त्या पूर्ण केल्या की तुमच्या ब्लॉगवर जाहिराती दिसतील. त्यामार्फत तुम्ही सुरुवातीला काही रुपये आणि नंतर हजारांत आणि पक्के तयार झाले की लाखो मध्ये पैसे कमवणार हे मात्र नक्की. इकडे विशेषतः तुम्ही $ मध्ये पैसे कमवणार आहेत. त्यासाठी ब्लॉगवर आणि अडसेन्स अकाउंट वर काही सेटिंग करून माहिती भरावी लागते. यासाठी google किंवा Youtube करा. तुम्हाला इत्यंभूत सर्व मार्गदर्शन मिळेल. 

चला तर नवीन ब्लॉग तयार करूया. स्वतःचा ब्लॉग तयार केल्यावर कमेन्ट करून नक्कीच कळवा. 

 

Immage Secure By -pixabay.com


 

 जसे आपण फेसबुक वर पोस्ट करतो तसेच इथे ब्लॉग पोस्ट लिहून ती पब्लिश करायची. तुम्ही कधीपासून ब्लॉग चालू करताय ते कमेंट मध्ये नक्की लिहा.

आशा आहे तुम्हाला ब्लॉगिंग बद्दल माहिती मिळाली असेल , आजुन सविस्तर माहिती आपण पण पुढे घेणारच आहोत. तुमच्या काही शंका किंवा सजेशन असल्यास कमेंट मध्ये नक्की लिहा. धन्यवाद!

 

Information source - THTS TEEM

 



Post a Comment

1 Comments

close