Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Multibagger Stock | लिस्टिंगनंतर काही दिवसात २१० टक्क्यांचा दणदणीत परतावा; शेअरचा भाव १०१ रुपयांवर

 

Multibagger Stock

लिस्टिंगनंतर काही दिवसात २१० टक्क्यांचा दणदणीत परतावा; शेअरचा भाव १०१ रुपयांवरIndian Renewable Energy Development Agency


 THTS LOOK PUNE  - (IREDA) : इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (आयआरईडीए) चे शेअर्स लिस्ट झाल्यापासून गुंतवणूकदारांना सतत श्रीमंत करत आहेत. शुक्रवारी या शेअर्सने बीएसईवर ७३.६७ रुपयांचा उच्चांक गाठला होता. इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे ते बीएसईवर १४ टक्क्यांनी वाढले होते.

आयपीओ किंमतीपेक्षा २१० टक्क्यांनी वाढ

सरकारी मालकीच्या वित्तीय संस्था कंपनीचा म्हणजेच IRDEA चा शेअर १३० टक्क्यांनी वाढला आहे. ज्याची किंमत ३२ रुपये प्रति शेअर आहे. IREDA ने २९ नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात पदार्पण केले. याचा अर्थ सात ट्रेडिंग दिवसांमध्ये हा शेअर त्याच्या आयपीओ किमतीपेक्षा सुमारे २१० टक्क्यांनी वाढला आहे.

कंपनी बद्दल

IREDA ही भारतातील एकमेव अक्षय ऊर्जा (RE) केंद्रीय सरकारच्या मालकीची नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) आहे. भारतातील सर्वात मोठी प्युअर-प्ले ग्रीन फायनान्सिंग NBFC म्हणून IREDA चे स्थान अक्षय ऊर्जा क्षेत्राच्या वेगवान वाढीचा फायदा उठवणाऱ्या मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे. २०१४ नंतर केंद्रातील नवीन सरकारने अक्षय ऊर्जा निर्मितीवर खूप भर दिला आहे. मार्च २०२० मध्ये IRDEA चे कर्ज वितरण २३,०००  कोटी रुपये होते. गेल्या तीन वर्षांत कंपनीने २४,००० कोटी रुपयांची भर घातली आहे. या वर्षी सप्टेंबरपर्यंत कंपनीचे कर्ज वितरण ४७,००० कोटींहून अधिक झाले आहे.


कंपनीची आर्थिक स्थिती

ही ३६ वर्षे जुनी वित्तीय कंपनी IREDA अक्षय ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता प्रकल्पांसाठी कर्ज वितरित करते. कंपनी प्रकल्प नियोजनापासून ते पोस्ट-कमिशनिंगपर्यंत आर्थिक सेवा पुरवते, ज्यामध्ये उपकरणे उत्पादन आणि प्रसारणाचा समावेश आहे. कंपनीच्या आर्थिक आरोग्याबद्दल बोलायचे झाल्यास, चालू आर्थिक वर्ष २०२३- २४  च्या पहिल्या सहामाहीत तिचे एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १५७७.७५ कोटी रुपयांवरून २३२०.४६ कोटी रुपयांपर्यंत वाढले असून या कालावधीत त्याचा निव्वळ नफा ४१०.२७ कोटी रुपयांवरून ५७९.३२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सकल एनपीए  ५.०६ टक्क्यांवरून ३.१३ टक्क्यांवर आला आणि निव्वळ एनपीए २.७२ टक्क्यांवरून  १.६५ टक्क्यांवर घसरला.


अधोरेखित मुद्दा : 

ही एक  सरकारी कंपनी आहे, सध्याचे सरकार २०२४ नंतर कायम राहिले आणि कंपनीने आणखी चांगली कामगिरी नोंदवली तर येत्या ३ ते ५ वर्षाच्या काळात कंपनी ६६० % ते १०५०%  परतावा देऊ शकत आहे. जसा Mazdock ने १०९७% परतावा केवळ ५ वर्षात दिला आहे. जर भारतीय इकॉनॉमी हीपुढील काही वर्षात ५ नंबर वरून ४ नंबरवर आली तर कंपनी ची ग्रोथ आणि शेअर्स मूल्य नक्कीच वाढेल. त्याही पुढे जर इकॉनॉमी येत्या १० ते १५ वर्षात ३ नंबर वर आली तर ? एकंदरीत रिस्क मॅनेजमेंट आणि  SL ट्रेलिंग करून दीर्घकालीन Holding साठी उत्तम Share आहे.
Post a Comment

0 Comments

close