Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अशी करा Setting आणि Youtube चॅनेल हॅक होण्यापासून वाचवा

 


आपला विचार जिथे संपतो तेथून पुढे हॅकरचा विचार सुरू होतो


 Image Secure - pixabay.com


                                   Ciber Crime ही एक मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक सरकारी आणि खाजगी कंपनीच्या वेबसाईट हॅक होत आहे. त्यामुळे संबंधित कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. आणि सॉफ्टवेअर आणि इतर गोपनीय माहिती चोरी होत आहे. त्यामुळे आपण आपला मोबाईल आणि लोपटॉप कसा हाताळतो आहे. यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. जर आपण काही Basic Settings केली तर हा धोका टाळू शकतो आहे. 

१) सोशल मीडियाचे दर १५ दिवसांनी पासवर्ड बदल करा.

२) पासवर्ड उदाहरण - Tanzaniya¥&0682©* असा असावा.

३) Id आणि पासवर्ड घरातील एका वहीत लिहून ठेवा.

४) Fb page ला घरातील दोन व्यक्तींना अडमीन करा.

५) Setting  मध्ये जाऊन Youtube चॅनेलवर घरातील एका व्यक्तीला मॅनेजर करावे.

६) Youtube चॅनेल ला brand चॅनेल करा. brand account ही एक सेटिंग आहे. जेव्हा चॅनेल Hack होते, तेव्हा चॅनेल ते परत आणायचे असेल तर ते brand Account नेच शक्य होते.

७) Youtube  चॅनेलला कोणत्या अडसेन्स खात्याशी जोडले आहे हे नोंद वहीत लिहून ठेवावे.

८) google crome आणि firefox हे ब्राऊझर वापरत असाल तर त्याची History रोज clear ची Auto Setting करा.

९) Youtube चॅनेल आणि fb वर Log in करताना सारखे Id आणि पासवर्ड टाकायला लागू नये म्हणून ते ब्राउझर  वर Save करू नका.

१०) Youtube चॅनेल आणि fb चे ई-मेल Id आणि मोबाईल नंबर सार्वजनिक करू नका. किंवा ते ऑनलाइन कोठेही  नमूद करू नका. आणि ते कोणालाही देऊ नका अर्थात सांगू नका.

११) ऍडसेन्स अकाउंट स्वतःच्या आणि बायकोच्या नावे असावे. इतर कोणी कितीही जवळचा असेल तरीही त्यांच्या नावे अकाउंट  काढू नये. 

१२) मोबाईल किंवा Pc, Loptop फॉरमॅट करण्याअगोदर सर्व आवश्यक त्या Aap चा Google Drive वर बॅकअप  घेऊनच Log Out करा. 

१३) Email, Whatsaap किंवा SMS वर येणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

१४) आपणाला प्रमोशन करायचे आहे म्हणून हजारो $ च्या अमिश दाखवून काही कॉल येतील, त्यांना कोणत्याही    प्रकारचे OTP देऊ नये. किंवा Id Password देऊ नये.

१५) आपले आवडते नंबर, मोबाईल नंबर, गाडी नंबर, घरातील व्यक्तीच्या नाव आणि जन्मतारीख असणारे पासवर्ड ठेवू नये.

१६) मोबाईल मधील असलेले सर्व सोशल मीडिया लॉग इन रोजच्या रोज लॉग आउट करत जावे. 

१७) Youtube चॅनेल आणि fb वर Log in करताना सारखे Id आणि पासवर्ड टाकायला लागू नये म्हणून ते मोबईल वरील Aap  आणि ब्राउझर वर Save करू नका.

१७) आपला विचार जिथे संपतो तेथून पुढे हॅकरचा विचार सुरू होतो.

                  वरील सूचना जरी सध्या वाटत असल्या तरी त्यास खूप परिणामकारक आहेत. आणि आपले होणारे संभाव्य नुकसान नक्कीच टाळू शकतील.  

 Image Secure - pixabay.com



 

Post a Comment

0 Comments

close