Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गुगल मॅप आता नव्या स्वरूपात ऑफलाईन मध्ये उपलब्ध होणार

  गुगल मॅप आता नव्या स्वरूपात ऑफलाईन मध्ये उपलब्ध होणार 

         Immage Secure By - pixabay.com


तुम्हाला जर एखाद्या पर्यटन स्थळे जायच असेल किंवा व्यावसायिक कामानिमित्त नव्या ठिकाणी जायचं असेल. तर तेथे जाण्याचा मार्ग तुम्हाला माहिती नसेल किंवा तुमच्या सोबत माहिती असणाऱ्या व्यक्ती किंवा तुम्ही ज्या वाहनाने जाणार आहात. त्या वाहनाच्या चालकाला त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग माहीत नसेल. तर तुम्ही सहाजिकच गुगल मॅप्सचा वापर करणार हे सर्वांनाच माहिती आहे. सध्याच्या आधुनिक काळामध्ये आणि धावपळीच्या युगामध्ये या तंत्रज्ञानाच्या जगात गुगल मॅप आपल्या सर्वाँचा आवडीचा आणि महत्त्वाचा घटक झालेला आहे. मात्र त्यावेळी इंटरनेटला काही समस्या निर्माण झाल्यास किंवा नेटवर्क सुटल किंवा नेटवर्क उपलब्ध नसताना गुगल मॅप्सचा वापर कसा करावा याबाबत अनेकांना माहिती नसते किंवा याबाबत ते अनभिज्ञ असतात.

1998 नंतर आपल्या हातामध्ये स्मार्टफोन उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे स्मार्टफोनचा वापर अधिकाधिक वाढत चालला आहे. पूर्वी केवळ फोन करणे आणि मेसेज वाचन करण्यासाठी भ्रमणध्वनीचा वापर होत असे. आपल्या जवळ असलेला मोबाईलचा उपयोग ह्याच कामासाठी लोक त्याचा वापर करत होते. पण आता स्मार्टफोनमुळे फोन मध्ये अनेक वेगळ्या प्रकारची काम होत आहेत. इंटरनेट आणि इंटरनेट स्पीडच्या उपलब्धतेमुळे मोबाईलचा वापर अनेक पटीने वाढलेली आहे. त्यातच आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये गुगल मॅप्सचा वापर खूप महत्त्वाचा मानला जात आहे. गुगल मॅप असा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही योग्य ठिकाणी नक्कीच अचूक रित्या पोहोचू शकतात. गुगल मॅपमध्ये जीपीएस तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही कोणत्याही स्थळी आणि कोणत्याही वेळी पोहोचू शकता.


तसेच तुमचा पत्ता आणि तुमचे ठिकाण इतरांना सुद्धा पाठवता येऊ शकते. त्याचप्रमाणे गुगल मॅप वरती तुमच्या कार्यालयाची जागा, तुमच्या वर्कशॉपची जागा किंवा तुमच्या घराची जागा लॉगिन करून सेव्ह करता येऊ शकते. जेणेकरून इतरांना तुमचं घर कार्यालय आणि वर्कशॉपची जागा शोधण्यासाठी उपयुक्त असा पर्याय उपलब्ध होईल.

    Immage Secure By - pixabay.com

    नव्या शहरात किंवा नव्या पर्यटनस्थळी किंवा एखाद्या नव्या गावाला गेल्यानंतर तेथील पत्ता किंवा मार्ग शोधायचा असेल. आपण गुगल मॅप्सचा वापरकरत करतो. गुगल मॅप मधील नेव्हिगेशन चा वापर करून आपण इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र याठिकाणी पोहोचण्यासाठी मोबाईलला पुरेसे नेटवर्क नसेल किंवा इंटरनेट उपलब्ध नसेल अनेक अडचणी निर्माण होत असतात. अशावेळी पत्ता व त्यासाठी आपल्याजवळ कोणी उपलब्ध नसेल तर ऐनवेळी अडचणीत भर पडते. परंतु आता काळजी करण्याचं काही कारण नाही. कारण गुगल मॅप या तंत्रज्ञानामध्ये इंटरनेट नसतानासुद्धा योग्य वापर करून फिचर वापरून आपण तिथे पोहोचू शकतो. त्यासाठी तुम्हाला काही टप्पे पार करावे लागतील. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकाल. चला तर पाहुयात ते कोणते टप्पे आहेत. तुम्हाला मोबाईल मध्ये कोणती सेटिंग करावी लागेल किंवा काही गोष्टी डाऊनलोड करून ठेवावे लागतील. तुम्हाला रेंज उपलब्ध नसेल या गोष्टी तुम्हाला खूप उपयुक्त पडतील. चला तर मग आपण खालील प्रमाणे पाहूया.


     Immage Secure By - pixabay.com


  1. तुमच्या मोबाईल मध्ये गुगल मॅप सुरू करा.

  2. त्यानंतर वरच्या बाजूला दिसणार्‍या तुमच्या प्रोफाईल वर क्लिक करा.

  3. तुमच्या समोर असलेल्या अनेक पर्यायांपैकी ऑफलाइन मॅप या पर्यायावर क्लिक करा.

  4.  त्यानंतर सिलेक्टीव्ह मॅप वर क्लिक करून तुम्हाला ज्या ठिकाणी किंवा निघायचे आहे ते ठिकाण निवडा.

  5. वरील टप्पे पार केल्यानंतर एक नकाशा तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल.

  6.  त्यानंतर तुम्ही ऑफलाईन असतानाही किंवा इंटरनेट किंवा रेंज मिळत नसल्यास अगदी सहजपणे जाऊ शकता.

  7.  त्यासाठी आपल्या नसलेल्या गुगल मॅप चा योग्य वापर करावा.

         

                                                            Immage Secure By - pixabay.com


वरील सर्व कार्यभाग पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ऑफलाइन मॅप्सचा वापर करण्यासाठी किंवा संबंधित नकाशाचा वापर करण्यासाठी तुम्ही आधीच इच्छित ठिकाणी किंवा स्थळी जाण्यासाठी इंटरनेट सुविधा असताना जतन ( Save ) करणे गरजेचे आहे. आणि हे जतन ( Save ) करण्यासाठी तुमच्याजवळ ज्यावेळी इंटरनेट आहे रेंज उपलब्ध असेल अशावेळी तो ऑफलाईन जतन ( Save ) करणे गरजेचे आहे. ही सूचना खूप महत्त्वाची आहे आपत्कालीन स्थितीमध्ये तुम्हाला ऑफलाइन मॅप योग्य ती दिशा दाखवण्याचं महत्त्वाचं काम करेल.


Post a Comment

0 Comments

close