Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

युट्युब चॅनेल किवर्ड म्हणजे काय? आणि ते कार्य कसे करत असते ? पहा What is a YouTube Channel Keyword? And what is that function?

 

युट्युब चॅनेल किवर्ड म्हणजे काय? आणि ते कार्य कसे करत असते ? पहा -

Immage Source By - wix.com



What is a YouTube Channel Keyword? And what is that function?

                            अनेकजण Youtube चॅनेल चालू करतात. पण त्यांना Youtube Channel ला Kyeword लावावे लागतात याची माहितीच नसते. त्यामुळे त्यांच्या चॅनेलची म्हणावी तशी प्रगती होत नाही. म्हणून चॅनेल किवर्ड हे खूप महत्वाचे असतात. 

            आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही नक्की काय भानगड आहे. चॅनेल कीवर्ड हे You Tube चॅनेलसाठी सामान्य Tag सारखे अगदी साधेच असतात. जरी ते साधे असले तरी ते खूपच महत्त्वाचे असतात. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की आपल्या चॅनेलसाठी कोणते आणि किती किवर्ड निवडायचे? आणि ते निवडले की ते कसे काम करतात.? निवडलेले किवर्ड आपण चॅनेलवर Set केले की ते व्हीडिओच्या SEO वर सरळसरळ परिणाम करतात. मग तसे असेल तर त्याचे ते कितपत परिणाम करू शकतात? आपणाला या लेखातून सविस्तर समजेल. 


आता आपण पाहू ह्या चॅनेल किवर्डची संपुर्ण माहिती- 

चॅनेल किवर्ड म्हणजे काय? 

युट्युब चॅनेल किवर्ड ही एक संज्ञा आहे. जी आपल्या चॅनेलबद्दल Youtube माहिती आणि संदर्भ देत असते. आपण निवडलेले किवर्ड हे आपल्या चॅनेलचे टेक्निकल पद्धतीने प्रतिनिधित्व करत असतात. आपल्या चॅनेलवर असणारे काही व्हीडिओ आणि तुम्हाला त्यातून प्रेक्षकांना नक्की कोणता संदेश द्यायचा आहे. हे काम किवर्ड करत असते. म्हणजे तुम्ही जेव्हा व्हीडिओ पब्लिश करत असतात. तेव्हा तो व्हीडिओ सर्वात वर आणि सजेस्ट कसा होईल हे काम किवर्ड करत असते. ह्या कीवर्डला Tag ची पण मदत मिळते. म्हणून किवर्ड हे चॅनेल मोठे करण्याची संधी असते. त्यामुळे ऑप्टिमाइझ केलेले चॅनेल किवर्ड youtube वर Views वाढविण्यासाठी मदत करत असतात.



चॅनेल किवर्ड का महत्त्वाचा आहे?

युट्युब चॅनेल किवर्ड इ आपले चॅनेलचे वर्णन, चॅनेलचे एकूण विषय आणि श्रेणी आपण तयार केलेले व्हीडिओचे प्रकार वापरात घेत असते. ज्यावेळी आपण चॅनेलनुसार चॅनेलचे किवर्ड योग्य पध्दतीने ऑप्टिमाइझ करतो.  तेव्हा आपण आपल्या वरील सर्व बाबतीतील रँकिंग श्रेणी निश्चितपणे वाढवू शकतो. 

तसे पाहिले तर youtube SEO रँकिंग घटकांच्या अभ्यासानुसार चॅनेल किवर्डला उच्च Youtube शोध (Surch) सूक्ष्म महत्वपूर्ण परस्पर संबंध असल्याचे आढळत आहे.


तसेच आणखी एक कारण आहे ते म्हणजे चॅनेल किवर्ड हे आपले चॅनेल कशाबद्दल आहे हे Youtube ला समजण्यास मदत करत असते. अनेक subscriber हे आपले चॅनेल शोधत असतात त्यावेळी किवर्ड हे चॅनेल रँक व्हायला मदत करते. 


सुचवलेले व्हीडिओ म्हणजे Sujected Video कॉलममध्ये कोणत्या व्हीडिओचा प्रचार करावा हे ठरवण्यासाठी Youtube हे चॅनेल किवर्ड वापरते. आपल्या हे लक्षात आले असेलच की कॉलम संबंधित चॅनेलवरील व्हीडिओची शिफारस Youtube Subscriber आणि इतर ऑडियन्सला करत असते.




कोणते किवर्ड निवडावे आणि ते कसे वापरावे? 

आपल्या Subscriber ला निश्चित काय हवे आहे. हे शोधू शकतील किंवा शोधण्यासाठी मदत करतील अशा किवर्डचा विचार करा. आपण आपल्या चॅनेलवर एक नजर टाका आणि अभ्यास करून पहा. आपण youtube चॅनेल वरून कोणती माहिती देत आहोत, या संबंधित विचार करा. त्या कल्पनांचा आणि शब्दांचा समावेश किवर्ड मध्ये करा. ते किवर्ड म्हणजे शब्द च असतात. 

Immage Source By - vitalstorm.com





किवर्ड मर्यादा किती असते? 

किवर्ड कोणते वापरावे हे समजले असेलच. तर मग ते मी किती वापरू शकतो? चांगल्या कीवर्डचा वापर करून आपल्या चॅनेलची आणि व्हीडिओची शोध (Surch) रँकिंग वाढवू शकत आहात. आपण आपल्या चॅनेलच्या माहितीचे प्रतिनिधित्व करणारे किवर्ड सुचिबद्ध करू शकत आहे. मग किती किवर्ड लावावे ??? याचा ठराविक मापदंड म्हणजे कमीत कमी किवर्ड १० ते १५ शब्द असणारे चांगले इतकेच लावावे. जर आपण अतिउत्साही होऊन जास्त किवर्ड लावले तर SEO वर परिणाम होऊन Surch मध्ये अडथळे निर्माण होतील आणि चॅनेल आणि व्हीडिओ हा म्हणावा तितका रँक होणार नाही. त्यामुळे योग्य आणि मोजकेच किवर्ड वापरावे.



किवर्डचे कार्य काय असतो?

तुम्ही व्हीडिओ केव्हा आणि कोठे पब्लिश केला किंवा दर्शविला  आहे. हे Youtube ला निश्चित माहिती व्हायला आणि तपासायला काही कालावधी लागतो. म्हणून हे निर्धारित करण्यासाठी व्हीडिओचा विभाग, व्हीडिओ वर्णन, आणि दृश्यांचा भाग खूप महत्त्वाचे असतात. म्हणून हे सर्व खूप गरजेचे आहे. यातूनच किवर्ड काम करते. आणि चॅनेलचा अर्थात व्हीडिओचा SEO होऊन चॅनेल आणि व्हीडिओ वर किवर्ड वर्क करत असते. आपणाला त्याचे रिझल्ट हे Views आणि Subscriber वाढ मध्ये दिसून येतात. 

 

चॅनेलचा कोणता भाग SEO ला मदत करतो?

आपल्या चॅनेल वरील व्हीडिओला रँक करण्यासाठी आणि त्याला चालना देण्यासाठी कीवर्ड ह्या विभागाचा वापर होतो. त्यामुळे चॅनेलवर असणारी माहिती आणि इतर गोष्टी काळजीपूर्वक नमूद करा. आपण ही माहिती डिस्क्रीशन, टॅग आणि कंटेंटच्या माध्यमातून दर्शकांना दाखवत असतो. हे सर्व Youtube चॅनेलच्या बाबतीत गंभीरपणे घेत असते. त्यामुळे आपल्या चॅनेलचा हेतू, मूल्य आणि माहिती विभाग यांची माहिती योग्य शब्दाचा वापर करून लिहीत जावे. त्यामध्ये Content, Disc, Tag चा समावेश होतो. त्यामुळे वरील गोष्टी काळजीपूर्वक लिहून झाल्यावर व्हीडिओ पब्लिश करावा. कारण हे सर्व सरळसरळ चॅनेलच्या रँकिंगवर परिणाम करतात. त्याला जबाबदार असतात ते सर्व किवर्डवर परिणाम करतात. 


किवर्ड कसे लावायचे? 


किवर्ड लावणे सहज आणि सोप काम आहे. असतात आपल्या Youtube चॅनेलवर जाऊन उजवीकडे असणाऱ्या youtube studio वर क्लिक करा. त्यानंतर डाव्या बाजूला सर्वात खाली Setting हा पर्यंत दिसेल. Setting वर क्लिक करा. त्यानंतर असा पर्याय दिसेल. म्हणजे वरून तिसरा पर्याय channel असे दिसेल त्याला क्लिक करा. आता तुम्हाला Kyeword हा पर्याय आणि मोठा box दिसेल. तर याच ठिकाणी जाऊन तुम्हाला किवर्ड लिहायचे आहेत. 




आम्हाला कळवा की तुम्ही किवर्ड कसे शोधत आहेत. वरील माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला काही शंका आणि प्रश्न असतील तर कमेन्ट करून नक्कीच संपर्क करा.

Information source - THTS TEEM

Post a Comment

0 Comments

close