Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तुमचा मोबाईल आणि डेटा सुरक्षित आहेत का ? मोबाईल हॅक होण्याचा धोका जाणवतो आहे का? Is mobile data secure? Is Mobile Hack By Air? In Marathi

 


तुमचा मोबाईल आणि डेटा सुरक्षित आहेत का? मोबाईल हॅक होण्याचा धोका जाणवतो आहे का? 

Is mobile data secure? Is Mobile Hack By Air? In Marathi 


Immage Secure By - pixabay.com



डिजिटल युगात मोबाईल हेच आता सर्व माहितीचे भांडार झाले आहे. त्यामुळे बँकच आपल्या खिशात आली आहे. शिवाय आपले सर्व डिजिटल स्वरूपातील कागदपत्रे मोबाईल मध्येच असतात. त्यामुळे मोबाईल दैनंदिन जीवनातील महत्वाचा घटक झालेला आहे. जवळपास सर्वच वैयक्तिक माहिती आपण मोबाईल मध्ये साठवून ठेवत असतो. आणि गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल हॅक होण्याचे आणि मोबाईल मधील डेटा चोरीची अनेक प्रकरण उघड होत आहे. यामुळे मोबाईल वापरणे धोकादायक ठरू शकते आहे.  त्यामुळे आपल्याला आपला डेटा आणि मोबाईल मधील इतर महत्त्वाची सामग्री हॅक (Hack) होण्या पासून वाचवायचे असेल. तर आपल्याला काही काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मोबाईल मध्ये काही गोष्टी बदल करण्याची आवश्यकता आहे. तर काही नव्याने Advance features समजून घेऊन त्यावर योग्य ती कळजी केली तर निश्चितच यावर उपाय आपल्याला सापडेल.


आपण त्या संदर्भात काही माहिती घेणार आहोत. त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत. तुमचा स्मार्ट फोन (Smartphone) असेल तर मोबाइल स्क्रीन लॉकचा सातत्याने वापर करा. मोबाईल बॅंकिंगचा वापर करताना स्क्रीन लॉकचे ऑप्शन वापरात जावे. त्यामुळे कोणालाही बँकेच्या ॲपमध्ये फेरफार करता येणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बँक खात्या संदर्भातील माहिती मोबाईल डिव्हाईस मध्ये साठवून ठेवू नका. बँक खाते क्रमांक, डेबिट कार्ड (Debit Card) आणि क्रेडिट कार्ड पिन (Credit Card Pin), त्यानंतर डेबिट आणि क्रेडिट कार्ड वरील नंबर आपल्या फोन मध्ये कधीही सेव्ह करू नका. 



तसेच व्हाट्सआप, Email, एसएमएस द्वारे आलेल्या अनोळखी  किंवा ओळखीच्या व्यक्तीने पाठवलेल्या लिंक कधीच उघडू नका. त्या सरळ डिलीट करन टाका.  त्याच प्रमाणे वेगवेगळ्या कंपनीकडून आपणाला फोन कॉल येतील उदाहरणार्थ मी फोन पे (Phone Pay  ), गुगल पे (Google pay)मधून बोलत आहे. किंवा मी पेटीएम (Paytm) मधून बोलत आहे. तुमचं अकाऊंट आम्हाला वेरिफिकेशन करायचे आहे. आम्ही तुम्हाला कोड पाठवू तुम्ही आम्हाला तो सांगायचा आहे.  कधी कधी एखादी लिंक पाठवली जाते. त्याला क्लिक करा ज्यावेळी अशी व्यक्ती कॉल करून सांगत असते. त्या वेळेस समजून घ्यायचं की तुम्हाला कोणतीही बँक किंवा ॲप (App) कोडची (Code) मागणी करणार नाही किंवा पाठवणार नाही. त्यामुळे या ठिकाणी जर तुम्ही कोड अनोळखी व्यक्तीला सांगितला किंवा आलेल्या लिंकवर क्लिक केलं. तर ते तुमचे अकाऊंट पूर्णपणे साफ करतील. आणि तुमच्या अकाऊंट मधील पैसे चोरी करतील. आणि मग तुमच्या हाता मध्ये काही राहणार नाही.  अशा कॉल पासून नेहमी सावध रहावे. याशिवाय मालवेअर अटॅकसाठी सर्वात घातक प्लॅटफॉर्म समाज माध्यम आहे. समाज माध्यमांमध्ये बरेच जर अशी काही माहिती शेअर करत असतात. त्यामुळे मालवेअर अटॅक होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी माध्यमे वापरताना आपण नेहमी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.




Immage Secure By - pixabay.com



तुमच्या कुटुंबाच्या नावाने किंवा सहज समजेल आणि ओळखता येईल असा कुठलाही पासवर्ड अर्थात सांकेतिक अंक तुम्ही  ठेवू नये. तसेच अक्षरांत बरोबर आकड्यांचा वापर पासवर्ड मध्ये  अवश्य करण्यात यावा. लॉगिन करताना रिमेंबर पासवर्ड  हा ऑप्शन कधीच वापरू नका. सार्वजनिक ठिकाणी कॉमन कम्प्यूटर वरून तुमचे ईमेल किंवा अन्य संकेत स्थळांना भेट दिल्यानंतर ब्राउझिंग हिस्टरी डिलीट करण्यात कधीच विसरू नका. कारण त्या मधून कदाचित आपली माहिती संदर्भात  धोकादायक गोष्टी हॅकर पाहू शकतील. आणि त्यातून आपल्या  मोबाईल मधील महत्त्वाच्या माहितीला धक्का पोचू शकतो, अर्थात हे होऊ शकते.



लॉग-इन करताना 'रिमेम्बर पासवर्ड' हे ऑप्शन वापरू नका. सार्वजनिक ठिकाणी किंवा कॉमन कॉम्प्युटर वरून तुमचे ई-मेल किंवा अन्य संकेत स्थळांना भेट दिल्यानंतर 'ब्राऊझिंग हिस्ट्री' आणि कुकीज डिलीट करण्यास विसरू नका.


सायबर क्राईमच्या तक्रारी किंवा सायबर फसवण्याचा अहवाल कोठे द्यावा ? 

तात्काळ नजीकच्या पोलिस स्टेशनला भेट द्या. सायबर क्राईमच्या तक्रारी ऑनलाईन नोंदविण्यासाठी राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टलला भेट द्या. या पोर्टलवर https://cybercrime.gov.in/  प्रवेश करता येतो. या पोर्टलमध्ये दोन विभाग आहेत. एक म्हणजे महिला आणि मुलांची संबंधित गुन्ह्यांचे अहवाल देणे. जेथे अहवाल गुप्तपणे दाखल केला जाऊ शकतो. दुसरा विभाग म्हणजे इतर प्रकारच्या सायबर क्राईमचा अहवाल देणे. आपण हेल्प लाईन क्रमांक 155260 वर डायल करून ऑफलाईन तक्रार देखील दाखल करू शकता. जर आपल्याला फसवणुकीचे एसएमएस (sms) ई-मेल, वेब लिंक, फोन कॉल वरुन आपल्या संवेदनशील वैयक्तिक माहितीसाठी किंवा बँकेचा तपशील विचारत असेल किंवा विचारला असेल. तर कृपया महाराष्ट्र सायबर च्या वेब पोर्टलवर https://www.reportphishing.in भेट द्या. Https://www.cert-in.org.in/  सीआरटी द्वारे जारी केलेल्या नवीन सल्ला आणि माहिती संदर्भ घ्या. 

                कोणत्याही चॅनेलद्वारे कोणत्याही प्रतिकृती क्रियाकलाप (Report any adverse activity) किंवा अवांछित म्हणजे गैर वर्तनाचा अहवाल सी आर टी इन वर द्या.

ई-मेल : incident@cert-in.org.in

हेल्पडेस्क : +91 1800 11 4949


त्यासाठी मेल क्रमांक घटनेची माहिती देताना खालील माहिती पुरविणे

घटनेची वेळ,

प्रभावित प्रणाली,

नेटवर्क संबंधित माहिती,

लक्षणे सांगावी.  

हरवलेला किंवा चोरी गेलेले मोबाईल फोन नोंदविण्यासाठी पोलिसांकडे प्रथम माहिती अहवाल एफ आय आर (FIR) दाखल करा. एफआयआर दाखल केल्यावर दूरसंचार विभागाला दूरसंचार विभाग हेल्प लाइन क्रमांक 14422 च्या माध्यमातून तत्काळ कळवा. किंवा https://ceir.gov.in  वर भेट देऊन सेंट्रल रिक्रुटमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) ऑनलाइन अनुयायी दाखल करा. 

                     पडताळणी नंतर दूरसंचार विभाग फोन मधील उपयोगापासून अवरोधित (बंद) करून त्याला ब्लॅक लिस्ट करेल. याव्यतिरिक्त जर कोणी सिम कार्ड वापरून डिवाइस (Mobile) वापरण्याचा प्रयत्न करीत असेल तर सेवा प्रदाता (Service Providers) नवीन वापर कर्त्याची ओळख पटवून पोलिसांना माहिती कळवेल.

NATIONAL CYBER CRIME COMPLAINT HELPLINE NUMBER - 155260

  1. E-mail : incident@cert-in.org.in

  2. Helpdesk : +91 1800 11 4949


त्यामुळे Mobile असो की Laptop वापरताना काळजी घेऊन आणि विचार करूनच वापरावा. जर आपणाला या संदर्भात काही माहिती नसेल तर तज्ञ व्यक्ती कडून माहिती घेऊनच त्याची हाताळणी करावी. वरील माहिती आपणास आवडली असेल आणि या संदर्भात आपल्याला काही प्रश्न असतील किंवा माहिती हवी असेल तर कमेंट करा. 


Information source - THTS TEEM


Post a Comment

0 Comments

close