Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वेब मास्टर म्हणजे काय? त्याचे कार्य कसे चालते ?

 वेब मास्टर म्हणजे काय? त्याचे कार्य कसे चालते ?


What is a webmaster? How does it work?

 

 Immage Secure By -pixabay.com

वेब मास्टर इंटरनेट तथा डिजिटल जगातील एक अद्भूत शब्द आहे. वेबमास्टर (Webmaster) शिवाय इंटरनेट आणि सोशल मीडिया चालणे शक्य नाही. 

वेबमास्टर आणि स्पायडरमॅनची तुलना होत असते. तर आपण ती आज समजून घेणार आहोत. वेब मास्टर नाव काढले की लगेच स्पायडरमन आठवतो. स्पायडरमन बाबत आपण चित्रपट आणि कॉमिक्स मध्ये माहिती पाहिली आहेच. पण वेब मास्टर म्हणजे स्पायडरमन नाही. मग वेब मास्टर आहे तरी काय?

कोळी स्वतःचे जाळे विणत असतो आणि त्याच्या याच कामावरून वेब मास्टर हा शब्द तयार झाला आहे. कारण कोळी त्याच्याकडे असणाऱ्या नैसर्गिक द्रवाने तो आकर्षक आणि नाजूक असे धागे तयार करत असतो. हे जाळे लवकर, सहसा डोळ्यांना दिसत नाही. बऱ्याचं वेळा ते जाळे अदृश्य असते पण ते सूर्याच्या प्रकाशात ते इंद्रधनुष्य जसे रंगीत असते अगदी तसेच हे जाळे चमकत असते. हे जाळे एकमेकांना जोडलेले असते. म्हणजे हे जाळे फांद्या फांद्यांना  जोडून तयार केलेले असते. कोळी दादा अशा जाळ्यावर दुरून लक्ष ठेवून असतो. त्याच्या आभासी रंगला पाहून अनेक कीटक त्याकडे आकर्षित होत असतात. कधी कधी जाळे काही कारणाने तुटले किंवा कोणी तोडले तर ते पुन्हा कोळी दुरुस्त करत असतो. जाळ्यावर किंवा जाळ्यात प्रवेश केलेल्या कीटकांना तो आपले भक्ष्य करून खाद्य म्हणून वापरत असतो.

 

 संगणक विश्वात असणाऱ्या वेबसाईट यांची तुलना कोळ्याच्या जाळ्याशी अनेकजण करत असतात. अनेक उद्योजक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपली वेबसाईट चांगल्या प्रकारे सजवत असतात. या सर्व बाबींचे व्यवस्थापन अर्थात देखरेख म्हणून वेब मास्टर काम पाहत असतो. हे काम जवळपास कोळ्या सारखे आहे. म्हणजे वेबमास्टर हा सायबर जगातील एक कोळीच आहे. 

 

वेबसाईट ही गूगल इंडेक्स मध्ये अनेक Page ने जोडलेली असते. त्यातून तिचे कार्य चालू असते. इंडेक्स हा वेबमास्टर चा मध्य बिंदू असतो. तसेच कोळ्याच पण जाळे अनेक धाग्यांनी म्हणजे फांद्यांनी बनलेले असते. तसेच वेबसाईटच्या अनेक लिंक असतात. त्यास आपण अनेक शाखा पण म्हणू शकत आहे. वेबसाईट तयार करताना त्या शाखा वापराव्या लागतात. त्यामध्ये HTMl, CSS, Java Script, Photoshop, Flash, Multimedia आणि अधिकची टेक्नॉलॉजी चा उपयोग करून वेबसाईट बनवली जाते.

Webmaster ही टेक्नॉलॉजी वापरताना त्याचे ज्ञान असणे आवश्यक असते. आवश्यकतेनुसार वेबमास्टरला योग्य तो वेबसाईटवर मजकूर लिहावा लागतो. वेबसाईट ही आकर्षक व्हावी यासाठी खास डिझाईन वापरावे लागते म्हणजे वेबसाईट दिसायला सुंदर दिसेल हे पण पाहावे लागते. वेबसाईटला भेट देणाऱ्याच्या डोळ्यांना त्रास होणार नाही असे रंग वापरावे लागत असतात.  एखादा युजर वेबसाईटवर आला तर त्याला योग्य ती माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी असे कसब webmaster कडे असावे लागत.  भेट देणाऱ्याला आपला प्रॉडक्ट्स् समजेल आणि त्याला तो विकत घेता येईल असे डिझाईन करावे लागते. यासाठी वेब मास्टर हा कल्पना शक्ती वापरणारा असेल तर हे काम सोपं होतं असते.

एखाद्या कंपनी ची अथवा संस्थेची वेबसाईट तयार करायची असेल. तर त्या वेबसाईट चे प्राथमिक स्वरूप किंवा आराखडा वेब मास्टर ला निश्चित करून तयार करावा लागतो. त्यासाठी नाव, स्थान, उद्देश, रचना, विक्री आणि व्यवस्थापन सह इतर महत्वाची माहिती एकत्र करून त्यासाठी सुबक आणि आकर्षक web page तयार करून ती वेबसाईट ला लिंक करावी लागतात. हे काम खूप कुशल आणि कौशल्याने करावे लागते. Web page च्या लिंक ह्या भेट देणाऱ्या युजर ला लवकर आणि हव्या तशा उघडता आल्या पाहिजे अशी डिझाईन करावी लागते.  

                                                          Immage Secure By -pixabay.com

 

वरील माहिती सातत्याने Update ठेवण्यासाठी web page चे म्हणजे पानांचे सातत्याने बदल आणि नूतनीकरण करावे लागते. हे काम नेमणूक केलेल्या विशेष व्यक्ती कडून केले जाते. त्यामध्ये मजकूर, चित्र, आणि ध्वनी, व्हीडीओ क्लिप्स संकलित करून त्याचे योग्य ते संपादन करून पब्लिश करण्याआधी त्यांची आकर्षक मांडणी करण्याचे काम हे वेब मास्टर करत असतो. त्यातील माहिती आणि मुद्दे ग्राहकाला माहिती होण्यासाठी काही फोटो हे clip art आणि सजावटीसाठी Graphic यांचा वापर केला जातो. मनोरंज आणि चलचित्र भासावे यासाठी HTML 5 वेब पानातील माहिती मध्ये जिवंत पणा आणावा लागतो. आपण त्याला सरळ आणि सोप्या भाषेत Animation असे संबोधित करत असतो.

ग्राहकांच्या मागणी नुसार आणि गरजेनुसार योग्य आणि मुद्देसुद माहिती जमा करून web page चे डिझाईन वेबसाईट च्या सर्व्हर वरील प्रोग्राम नुसार होत असते किंवा करता येते. अशा वेबसाईटला डायनॅमिक वेबसाईट म्हणतात. यासाठी स्वतंत्र डाटा बेस MSSQ, MYSQL आणि PHP, डॉट नेट, Java यांचा उपयोग होतो. या व्यतिरिक्त स्टॅटिक वेबसाईट मध्ये डाटा बेस न वावरता वेबसाईट आणि वेबपेजेस तयार करून त्यांचा एक गठ्ठा सर्व्हरवर जतन केला जातो.

ह्या कामासाठी वेब मास्टर असतो तो वेबसाईट तयार करतो आणि तिचे व्यवस्थापन पण करतो. वेबसाईटवर काम।करताना वेगवेगळ्या डिझायनर ची मदत घ्यावी लागते. मग असे काम बाहेरच्या वेब डिझायनर कंपनीच्या मार्फत करून घेतले जाते. झालेल्या कामाचे मूल्यमापन, देख्ररेख आणि सुधारणा करण्याचे काम वेब मास्टर ला करावे लागते.

 अशा प्रकारे वेब मास्टर चे काम चालत असते. आमची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेन्ट करून कळवा. 

Information source - THTS TEEM

 

 

 


Post a Comment

0 Comments

close