Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

व्हाट्सअप पे वरून पैशांची देवाण-घेवाण सुरू | कसे कराल व्यवहार? अधिक माहितीसाठी वाचा

 


डिजिटल इंडिया नुसार आता पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची अजिबात आवश्यकता राहणार नाही.  आता व्हाट्सअप पे सर्विस सुरू करण्यात आलेली आहे. आता व्हाट्सअप पे ( WhatsAap Pay ) वरून तुम्ही नातेवाईकांना त्यांना पैसे पाठवू शकतात.



 व्हाट्सअप पे वरून पैशांची देवाण-घेवाण सुरू एसबीआय बँकेत सह इतर 4 बँक सोबत पार्टनरशिप



Image secure :  arjun said 



पुणे - भारतामध्ये व्हाट्सअप पे चे  ( WhatsAap Pay ) आणि फेसबुकचे सर्वात जास्त वापर करते आहेत. फेसबुकची मालकी असलेल्या व्हाट्सअप पे मी आज घोषणा केलेली आहे, की आता भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी बँक, आय सी आय बँक आणि ॲक्सिस बँकेत सोबत पार्टनरशिप केल्याने आता देशातील दोन कोटीहून जास्त ग्राहकांना आता व्हाट्सअप पे वापरता येणार आहे. या बॅंकामुळे व्हाट्सअप पे  ( WhatsAap Pay )  वापरणं अधिक सुलभ आणि सहज होणार आहे.



जवळपास दोन वर्षानंतर व्हॉट्सऍप पेमेंट या सेवेला नोव्हेंबर महिन्यात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून 160 बँकांसोबत  यूपीआय वर लाईव्ह जाण्याची परवानगी मिळालेली आहे. व्हॉट्सऍप च्या नवीन सुविधेमुळे लोकांना आता सहज सोप्या पद्धतीने पैशांची देवाण-घेवाण करता येणार आहे. 


फेसबुक फ्यूल फोर इंडिया वर्च्युअल कार्यक्रमात व्हाट्सअपचे भारतातील प्रमुख अभिजीत बोधे यांनी जाहीर केले की लोकांना आता व्हाट्सअप वरून कुटुंबातील कोणत्याही इतर सदस्यांना सहज पैसे पाठवता येणार आहेत.



पैसे पाठवण्यासाठी कोणत्याही स्थानिक बँकेत जाण्याची गरज त्यांना आता पडणार नाही. लोकांना घरी बसून पैसे पाठवतात येऊ शकतात.


व्हाट्सअप वर पेमेंट ची सुविधा गुगल पे फोन पे भीम ॲप आणि अन्य बँकांच्या ॲप सारखीच सहजसोपी असणार आहे. त्यामुळे व्हाट्सअप च्या वॉलेट मध्ये पैसे ठेवण्याची गरज नाही. कारण आता तुम्ही व्हाट्सअप द्वारे आपले बँक अकाउंट करून पेमेंट करू शकाल. तशी सुविधा व्हाट्सअप पे  ( WhatsAap Pay )  मध्ये देण्यात आलेली आहे. यावेळी पेमेंटसाठी रजिस्टर कराल त्यावेळी तुम्हाला व्हाट्सअप वर एक फ्रेश यूपीआयडी क्रीएट करावा लागणार आहे. त्यानंतर तुमचे पेमेंट सेक्शन वर जाऊन या आयडीला पाहू शकता यानुसारच पुढील व्यवहार होतील.



व्हाट्सअप पेमेंटचा  ( WhatsAap Pay ) वापर आणि उपयोग करुन तुम्ही पैसे पाठवू शकतात. ज्यांच्याकडे यु आय आहे. जसे भीम, गुगल पे किंवा फोन पे सारखे याद्वारे व्यवहार करू शकता. ज्यांना पैसे पाठवायचे असतील त्यांच्याकडे व्हाट्सअप पेमेंट नसेल तरी त्यांना पैसे पाठवता येऊ शकणार आहेत. त्यासाठी एक लाख रुपयांची देवान-घेवान सीमा ठेवण्यात आलेली आहे. ही एक फ्री देण्यात आलेली सेवा आहे. त्याच्या देवाणघेवाणीवर कोणतेही शुल्क किंवा सेवा शुल्क आकारले जाणार नाही.

त्यामुळे व्हाट्सअप पेमेंट ( WhatsAap Pay )  वापरून अनेकांना एक लाखापर्यंत व्यवहार करता येणार आहेत. त्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे व्हाट्सअप चे वापरकर्ते वाढण्याची शक्यता आहे.



Post a Comment

0 Comments

close